Party meeting : जातीवर टोकाची भूमिका पक्षाची प्रतिमा बिघडवते !

Ajit Pawar’s direct warning to Chhagan Bhujbal : अजित पवारांचा छगन भुजबळांसमोर थेट इशारा

Mumbai: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटा मध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री आणि राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी थेट भुजबळांसमोरच मांडण्यात आली.

माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे रात्री उशिरा झाली. या बैठकीत अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात मतभेद उफाळून आले. अजित पवारांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात. त्यांच्या वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा चूकीची बनते आणि पक्षाला त्याची किंमत मोजावी लागते.”

Local Body Elections : मोर्शी व अचलपूरमध्ये पुन्हा महिलांना संधी, सलग दुसरी वेळ

अजित पवारांचा हा इशारा छगन भुजबळांच्या अलीकडच्या विधानांवर होता. भुजबळ यांनी आझाद मैदानावर मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली होती. पवारांनी या पार्श्वभूमीवर भुजबळांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली.

बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबतही चर्चा झाली. अजित पवारांनी सांगितले की, “प्रत्येक जिल्ह्यात राजकीय समीकरण वेगळं आहे. त्यामुळे युतीबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घ्या.” तसेच राज्याची आर्थिक स्थिती भक्कम नसली तरी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पॅकेज जाहीर केल्याचं त्यांनी सांगितलं. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पवारांनी आमदारांना सूचित केले की, “जनतेसमोर सरकारच्या कामांचा उल्लेख करा आणि सकारात्मक संदेश द्या.”

पुढील आठवड्यात राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक घेऊन निवडणुकीबाबत अधिक चर्चा करण्यात येणार असल्याचंही अजित पवारांनी जाहीर केलं. त्यांनी आमदारांसोबत संवाद साधत कॅबिनेट बैठकीतील निर्णयांबाबत माहिती दिली.

दरम्यान, छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात आपली भूमिका कायम ठेवली आहे. त्यांनी सरकारला दिलेल्या पत्रात नमूद केलं की, “हा जीआर दाबाखाली काढण्यात आला आहे. ओबीसी समितीशी कोणतीही चर्चा न करता सरकारने निर्णय घेतला. जीआरमध्ये ‘कुणबी मराठा’ किंवा ‘मराठा कुणबी’ असा उल्लेख असायला हवा होता, मात्र फक्त ‘मराठा समाज’ असा उल्लेख केल्याने ओबीसींचे नुकसान होईल.”

Severely Hit by Heavy Rainfall :अतिवृष्टीचा राज्याला जबर फटका; ३४ जिल्ह्यांतील ६९ लाख हेक्टर क्षेत्र बाधित

या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यातील मतभेद स्पष्टपणे पुढे आले आहेत. राष्ट्रवादीत या वादाचा पुढील राजकीय परिणाम काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.