Congress Meeting : वंचितला सोबत घ्या, पण महायुतीतील कोणताही पक्ष चालणार नाही

No Party from the Mahayuti Will Be Supported : काँग्रेसमध्ये ‘स्थानिक हायकमांड’चा नवा प्रयोग, निर्णय प्रक्रियेचे विकेंद्रीकरण सुरू

Akola आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुकांमध्ये प्रभाग ते तालुकास्तरापर्यंत महायुतीच्या घटक पक्षांना वगळता कोणत्या पक्षांसोबत आघाडी करायची, याचा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकमताने घ्यावा. पक्ष स्तरावर पडताळणी करून त्यास अंतिम मंजुरी दिली जाईल.

पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या निर्देशानुसार सत्तेसोबतच निर्णय प्रक्रियेत विकेंद्रीकरणाचा प्रयोग या निवडणुकांपासून सुरू केला जात आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत दिली.

अकोला शहरातील एका हॉटेलमध्ये अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची विभागीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पाचही जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, महानगर व शहर अध्यक्ष तसेच प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.

Party meeting : जातीवर टोकाची भूमिका पक्षाची प्रतिमा बिघडवते !

अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सद्यस्थितीचा आढावा जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी सादर केला, तर महानगर काँग्रेसच्या कामकाजाचा अहवाल अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे यांनी मांडला.

यावेळी मंचावर डॉ. सुनील देशमुख, ॲड. गणेश पाटील, खासदार बळवंत वानखेडे, आमदार साजिद पठाण, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, बैठकीचे समन्वयक प्रकाश तायडे, तसेच बबनराव चौधरी, हिदायत पटेल, डॉ. जिशान हुसेन, प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, महेश गणगणे, महेंद्र गवई, अक्षय राऊत, प्रशांत पाचडे, पूजा काळे आणि आकाश कवडे उपस्थित होते.

आघाडीचा निर्णय घेताना भाजपसोबतच्या महायुतीतील कोणताही पक्ष सोबत घेता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश सपकाळ यांनी दिले. तसेच, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), उद्धवसेना आणि समविचारी पक्षांशीच आघाडी करण्याचे त्यांनी सुचवले.

Severely Hit by Heavy Rainfall :अतिवृष्टीचा राज्याला जबर फटका; ३४ जिल्ह्यांतील ६९ लाख हेक्टर क्षेत्र बाधित

अकोला जिल्ह्यात कुठल्याही पातळीवर आघाडी करण्याच्या निर्णयात वंचित बहुजन आघाडी समविचारी असल्याने ती सहकार्याची इच्छा व्यक्त केल्यास त्यांनाही सोबत घ्यावे, असेही सपकाळ यांनी नमूद केले.