Congress Leader Vijay Wadettiwar Issues Stern Warning to MahaYuti Government : दम असेल तर तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रात ओबीसींना ४२ टक्के आरक्षण द्या
Nagpur : राज्यातील सकल ओबीसी समाजाच्यावतीने आज (१० ऑक्टोबर) नागपुरात मोर्चा काढण्यात आला. यशवंत स्टेडीयेमवरून हा मोर्चा निघून संविधान चौकात मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या सभेला संबोधित करताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार कडाडले. आमची मागणी ऐकली नाही तर मुंबईच काय तर ठाणे, पुणे सर्वच जाम करून टाकू, असा इशारा त्यांनी दिला. सरकारने २ ऑक्टोबरला जो जीआर काढला, तो अन्यायकारक आहे. सरकारमध्ये दम असेल तर तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रात ओबीसींना ४२ टक्के सवलत द्या, असे आव्हानही त्यांनी दिले.
महायुती सरकारच्या त्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाज अस्वस्थ झाला आहे. हा शासन निर्णय सरकारने रद्द करावा, त्यासाठी आजचा मोर्चा आहे. नागपुरातील आजचा महामोर्चा फक्त झाकी आहे. यापुढे यापेक्षाही भव्य मोर्चा काढू, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. शासनाच्या जीआरनंतर मराठवाड्यात दररोज हजारो प्रमाणपत्रांचे वाटप सुरू आहे. त्यामुळे राज्यात ओबीसी तरुणांचे आत्महत्या सत्र सुरू झाले आहे. फक्त जरांगे यांच्या भरोशावरच महायुतीचे सरकार आले का, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.
Rane Vs Pathan : वातावरण खराब झालं तर सभा बंद कराव्या लागतील !
ओबीसीमधील ३७४ जादींनी पण या सरकारला कौल दिला आहे. ही बाब सरकार विसरले. म्हणूनच ओबीसींवर अन्याय सुरू आहे. सरकारच्या या शासन निर्णयामुळे ओबीसींच्या मानेवर सुरी फिरणार आहे. त्यामुळे सरकारने आत्ताच आपली भूमिकेत सुधारणा करावी. नाहीतर मुंबईसह ठाणे आणि पुणे येथे जाम करू. आमचा डीएनए ओबीसी आहे, असे सत्ताधारी सांगतात. तर मग हा शासन निर्णय करून तुमचा डीएनए सिद्ध करा, असे आव्हानदेखील विजय वडेट्टीवार यांनी दिले.
IPS Puran Kumar : देश हादरवणाऱ्या आयपीएस आत्महत्याप्रकरणी खळबळ !
ओबीसी समाजात मराठा समाज घुसत आहे. तो समाज पैलवान आहे. हिंद केसरी असलेला मराठा समाज आहे. दुसरीकडे ओबीसी समाज हा कुपोषीत आहे. त्यांच्यासमोर ओबीसी टिकणार नाही. म्हणूनच ही ओबीसींच्या अस्तित्वाची लढाई आहे. एकीकडे सरकार म्हणते की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, दुसरीकडे ओबीसीमध्ये घुसखोरी सुरू केली आहे. सरकारमध्ये दम असेल तर तेलंगणा सरकार प्रमाणे महाराष्ट्रात ओबीसींना ४२ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.