Temperatures expected gradually rise, leading increased heat : हळूहळू तापमानात वाढ होऊन उकाडा वाढण्याचा अंदाज
Mumbai : मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाळ्याने अखेर महाराष्ट्रातून निरोप घेतला आहे. १० ऑक्टोबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, विदर्भातील अकोल्यापासून कोकणातील अलिबागपर्यंत ही रेषा खाली सरकली आहे. मुंबईतूनही शुक्रवारी मान्सूनने माघार घेतल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
पाच महिन्यांच्या अखंड पावसानंतर अखेर विश्रांती मिळाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असला तरी आता उकाड्याने हैराण करणारा ‘ऑक्टोबर हीट’ सुरू होण्याची चिन्हं स्पष्टपणे दिसत आहेत. शुक्रवार पासून काही भागात उकाडा जाणवला, आणि हवामान विभागाने रविवारीपासून तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईच्या सांताक्रूझ परिसरात कमाल तापमान पुढील आठवड्यात ३५ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. रविवारपासून आभाळ अधिक निरभ्र राहणार असल्याने उन्हाचा तडाखा थेट जाणवेल. हवेत अद्याप आर्द्रता असल्याने ‘ह्यूमिड हीट’चा परिणामही प्रकर्षाने जाणवणार आहे.
Local body election : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हलचालींना वेग !
गेल्या १५ दिवसांपासून मान्सूनचा परतीचा प्रवास खोळंबलेला होता. दरवर्षी साधारणपणे ५ ऑक्टोबरला खान्देशात पोहोचणारा परतीचा मान्सून यंदा तब्बल पाच दिवस उशिराने, म्हणजेच १० ऑक्टोबरला प्रवेशला. हवामान विभागानुसार, पुढील तीन ते चार दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून पूर्णपणे माघार घेईल आणि १५ ऑक्टोबरपर्यंत नैऋत्य मौसमी वारे देशाच्या बाहेर जातील.
Government scheme : सुरू असलेल्या योजना कायम चालतात असं नाही !
दरम्यान, १० ऑक्टोबर रोजी सकाळी कुलाबा येथे ८१ टक्के आणि सांताक्रूझ येथे ७२ टक्के आर्द्रता नोंदली गेली. सायंकाळी ही आर्द्रता अनुक्रमे ६० आणि ६१ टक्क्यांपर्यंत खाली आली. शुक्रवारी सांताक्रूझ येथे ३३.७ अंश सेल्सिअस, तर कुलाबा येथे ३२.५ अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदलं गेलं.
आता पावसाने निरोप घेतल्यामुळे आणि आर्द्रता अद्याप कायम असल्याने येत्या काही दिवसांत ‘ऑक्टोबर हीट’चा चटका अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे उकाड्याच्या दिवसांसाठी सज्ज राहणं गरजेचं ठरणार आहे.
_____