Breaking

Farmers will get electricity during the day : ८३० शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज!

Second solar project in the district commissioned at Bori (Mehekar) : बोरी (मेहकर) येथे जिल्ह्यातील दुसरा सौर प्रकल्प कार्यान्वित

Buldhana मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत जिल्ह्यात ७ मेगावॅट क्षमता असलेला मेहकर तालुक्यातील बोरी सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ३३ केव्ही उखळी उपकेंद्राअंतर्गत ८३० शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्याची सोय झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे

पळशी बुद्रूक येथील ५ मेगावॅट सौर प्रकल्प (५ ऑक्टो) सुरू झाल्यामुळे त्या प्रकल्पातून परिसरातील ७०० शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे, हे विशेष. शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा, अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्याचा उद्देश आहे. त्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्ह्यात ६७ विकेंद्रीत सौर प्रकल्पातून ५२ उपकेंद्रासाठी १९६ मेगावॅट वीज निर्मित करण्यात येणार आहे.

Gondia Zilla Parishad जिल्हा परिषद अध्यक्षाचा फैसला १८ जानेवारीला !

त्यातील पळशी बुद्रूक आणि बोरी असे दोन प्रकल्प सुरू झाले आहे. त्यामुळे या दोन प्रकल्पांतून १ हजार ५३० शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार आणि दिवसा वीज द्यायला सुरूवात झाली आहे. तथापि जिल्ह्यातील बोरी सौर प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टिने जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्याकडून विशेष प्रयत्न करण्यात आले.

मेघा इंजिनिअरींग (MEIL) या विकासकाच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. मेहेकर तालुक्यातील बोरी हा सौर प्रकल्प ७ मे.वॅ. क्षमतेचा आहे. तो ३५ एकर शासकीय जमिनीवर उभारण्यात आला आहे. तसेच २५ एकर शासकीय जमिनीवर उभारण्यात आलेला बुलडाणा तालुक्यातील पळशी बुद्रूक येथील प्रकल्प ५ मे.वॅ.क्षमतेचा आहे.

Illegal Gender identification tests reduced : गुड न्यूज..! बेकायदेशीर गर्भलिंगनिदानाच्या तक्रारी कमी झाल्या ! 

‘मॉडेल सोलर व्हिलेज’ वर्ध्यात
हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट (राठी) या गावात विजेपासून जेवणापर्यंत सर्व कामे आता सौरऊर्जेचा वापर करूनच होत आहेत. त्यामुळे चिचघाट हे गाव विदर्भातील पहिले संपूर्णपणे सौरऊर्जेचा वापर करणारे गाव ठरले आहे. संपूर्ण गाव सौरऊर्जेच्या प्रकाशात झळकणार आहे.