Although the birth rate of girls is increasing, the situation is alarming : मुलींचा जन्मदर वाढतोय, तरीही परिस्थिती चिंताजनक
Gondia बेकायदेशीर गर्भलिंगनिदान करण्याचा प्रकार आजही भारतात मोठ्या प्रमाणात होत आहे. केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातही हे प्रकार बघायला मिळतात. महाराष्ट्रातील स्थिती त्या तुलनेत आता आटोक्यात आली आहे. आदिवासी पट्टा आणि दुर्गम समजल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदानाच्या तक्रारी गेल्या दोन वर्षांपासून थांबल्या आहेत, अशी सुखद धक्का देणारी माहिती पुढे येत आहे. परिणामी जिल्ह्यामध्ये मुलींचा जन्मदर वाढतोय, पण तरीही मुलांच्या तुलनेत कमीच आहे.
गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ या आठ महिन्यांत मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर थोडा कमी आहे. परंतु हा फरक हळूहळू कमी होत आहे. या कालावधीत ५५२७ मुले व ५१०८ मुली जन्माला आल्या आहेत. एक हजार मुलांमागे ९२४ मुली आहेत.
Vanchit Bahujan Aghadi : पाणीपट्टीचा प्रश्न आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारात !
गोंदिया जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर ८ टक्क्यांनी कमी आहे. मात्र, गर्भश्रीमंत कुटुंबांकडून किंवा गरीब कुटुंबातून मुलांसाठीचा अट्टाहास केला जातो. हे चित्र आता हळूहळू बदलत आहे. सर्वसामान्य कुटुंबांमध्ये मुलगा-मुलगी असा भेद करण्याचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुलींचा जन्मदरही वाढत आहे.
मागील दोन वर्षांत गर्भतपासणी केंद्रांवर लिंगाचे निदान करण्याच्या तक्रारी येणे बंद झाले आहे. नियमित तपासणी व भेटीतही असे तथ्य आढळून आले नाहीत. यामुळे मुलींचा जन्मदर वाढत असल्याची माहिती येत आहे. शासनाच्या विविध उपाययोजनांतर्गत गरोदर मातांची मोफत तपासणी करण्यात येत असते. आरोग्य विभागाची चमू रुग्णांना योग्य उपचार देण्यासाठी धडपडत असते. प्रसूतीदरम्यान कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून गरोदर मातांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे असते.
Mahayuti Government : मुंबईच नव्हे नागपूरही महिलांसाठी असुरक्षित!
आरोग्य विभागातर्फे मुलीचा जन्म झाल्यानंतर विविध योजना राबविण्यात येतात. प्रोत्साहन निधी देण्यात येतोय मात्र तरीही ग्रामीण भागात मुलींच्या जन्माबाबत नागरिकांकडून गांभीर्याने घेतले जात नसल्याचे दिसून येते. सन २०२४-२५ या वर्षात हजार मुलांमागे ९२४ मुलींची नोंद आहे. तर मागील वर्षातही हजार मुलांमागे ९४२ मुलींची नोंद होती.








