New controversy : दुष्काळ असो किंवा नसो लोक पुढाऱ्यांना शिव्या देतात !

Minister Gulabrao Patil’s controversial statement sparks : मंत्री गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त वक्तव्याने नवा वाद

Jalgaon : महायुतीतील नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये. नुकतेच सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी “लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, म्हणून आम्ही निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो” असं वक्तव्य करून चर्चेचा विषय ठरले होते. त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दुष्काळावर बोलताना आणखी एक वाद निर्माण केला आहे. “दुष्काळ पडला तरी लोक पुढाऱ्यांना शिव्या देतात, आणि दुष्काळ नाही पडला तरीही पुढाऱ्यांनाच शिव्या बसतात,” असं ते म्हणाले आहेत.

अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी लोकांच्या मानसिकतेवर भाष्य करताना म्हटलं, “लोकांना सवय झाली आहे पुढाऱ्यांना दोष द्यायची. दुष्काळ असो वा नसो, लोक शिव्या घालणारच. शिव्या ऐकणं हाच आमचा धंदा झाला आहे. ज्याला शिव्या ऐकायच्या असतील त्यानेच आमदार व्हावं,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

Ladki bahan Yojana : पती किंवा वडील हयात नसल्यास इकेवायसी कशी?

पाटील पुढे म्हणाले, “आम्हीही संघर्षातून वर आलो आहोत. आमच्यावर लोकांनी ‘गद्दार’ अशी शिक्कामोर्तब केली, पण आम्ही बदनामीचा विचार करत नाही. आम्ही फक्त एवढाच विचार करतो की, लोकांच्या सेवेकरता काम करायचं.” त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला असला, तरी त्यातून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Sudhir Mungantiwar : दिलेला शब्द मुनगंटीवारांनी काही तासांतच केला पूर्ण !

दरम्यान, महायुती सरकारमधील मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्यं सातत्याने चर्चेचा विषय ठरत आहेत. काही दिवसांपूर्वीच सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं होतं, “लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचं असतं, म्हणून काहीतरी आश्वासन द्यावं लागतं.” त्यांनी सांगितलं होतं की, “लोकांनी स्वतः ठरवलं पाहिजे की, निवडणुकीत नेमकं काय मागायचंय. काहीजण नदी मागतात, काहीजण पूल, तर काहींना फक्त आश्वासन पुरतं समाधान असतं.”

Local body elections : मित्रपक्षांना त्रास नको, पण स्वबळाचा अधिकार जिल्हाध्यक्षांना !

या सलग वादग्रस्त वक्तव्यांमुळे विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. “शेतकरी, कामगार आणि सामान्य जनतेच्या अडचणींवर उपाय न करता महायुतीचे मंत्री लोकांची थट्टा करत आहेत,” असा आरोप विरोधकांकडून होत आहे.

एकूणच, दुष्काळाच्या छायेत राज्य झगडत असताना, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.

_____