Government Rejects Demand to Grant Fourth-Class Status to Kotwals : कोतवालांच्या मागण्यांवर गुरुवारी बैठक, ‘नेहरू सेंटर हे नाव का दिलं नाही हा प्रश्नच चुकीचा’
Nagpur : चतुर्थ श्रेणीमध्ये समावेश करण्यासाठी नागपुरातील संविधान चौकात कोतवालांचं आंदोलन सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाला गणमान्य नेत्यांनी भेटी दिल्या. पण तोडगा निघू शकला नाही. यासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारणा केली असता, राज्यात चतुर्थश्रेणी बंद झाली आहे. ती आता देऊ शकत नाही. पण त्याच बरोबरीने त्यांच्या इतर काही मागण्या आहेत. त्यासाठी येत्या १६ तारखेला बैठक बोलावली आहे’, असे ते म्हणाले.
सायन्स सेंटरला नाव देण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेबाबत विचारले असता, नेहरू सेंटर हे नाव का नाही दिलं, हा प्रश्न योग्य नाही. यापेक्षा लायन्स सेंटर आधुनिक आहे आणि विकसीत भारतासाठी महत्वाचे आहे. नावाच्या भानगडीत पडण्याची काहीही गरज नाही. विरोधी पक्षातील काही लोक निवडणूक आयोगात जाण्याच्या तयारीत आहे. यावर बावनकुळे म्हणाले हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही आक्षेप घेतले होते. त्यांनी कितीही आक्षेप घेतले तरी अडचण नाही. आम्ही आमचं काम करत राहू.
Local Body Elections : काँग्रेस-राष्ट्रवादी भेटले, शिवसेना वेटिंगवर!
महानगरपालिकेप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींमध्येही स्वीकृत सदस्य असावे, अशी मागणी आहे. यासाठी जिल्हा परिषद अधिनियमात सुधारणा करून महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य आहेत, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेत तीन आणि पंचायत समितीमध्ये दोन स्वीकृत सदस्य असावे. यासाठी कालच्या (१३ ऑक्टोबर) बैठकीत मी मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा परिषद अधिनियमात सुधारणा करून जिल्हा परिषद आणि पंचायत समितींमध्ये स्वीकृत सदस्य नेमतील, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
Chandrashekhar Bawankule, Sanjay Khodke : नेहरू मैदानावरून महायुती व महाविकास आघाडी आमने-सामने
तीन महिने रेती बंद होती. रेती धोरण लोकांना रेती मिळवण्यासाठी तयार केलं गेलं आहे. आता ५०० च्या वर रेती घाटांचा लिलाव करायचा आहे. त्यांनी जे काही मांडलं आहे, त्याचे उत्तर आम्ही न्यायालयात देऊ, असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.








