Bachchu Kadu : आधीचा देवेंद्र भाऊ आता दिसत नाही !

The Devendra Fadnavis We Knew Is No Longer the Same : नैसर्गिक संकटापेक्षा सत्ताधाऱ्यांनी लादलेले संकट मोठे

Nagpur : महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठे संकट आले आहे. पण या आस्मानी संकटापेक्षा सुलतानी संकट मोठे आहे. राज्यकर्ते सुलतान बनले आहेत. आपले देवेंद्र भाऊ पूर्वी बैलबंडीभर पुरावे घेऊन फिरताना दिसले होते. विदर्भाच्या अनुशेषाकरिता आरडाओरड करणारे देवेंद्र भाऊ आता दिसत नाही. आधीचे आपले जुने देवेंद्र भाऊ दिसावे, हीच अपेक्षा आहे, असे म्हणत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, ५ हजार ३२८ रुपये भावाचे सोयाबीन फक्त तीन हजार रुपयांना विकावे लागले. आधीच पिक कमी झाले अन् त्यातही भाव कमी. यामुळे शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडून गेले आहे. पंजाबमध्ये ९० टक्के माल हमीभावात खरेदी केला जातो. आपल्याकडे १० टक्के पण माल हमी भावात खरेदी केला जात नाही. अद्याप खरेदी केंद्र सुरू झाली नाहीत. सरकार किती निर्दयी झालं आहे, हे अख्खा महाराष्ट्र बघत आहे. मुख्यमंत्री विदर्भाचा असूनही सोयाबीन उत्पादकांचे हाल सुरू आहेत. तरीही त्यांना कदर येत नाही.

Maharashtra Government : आर्थिक स्थैर्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

महानगरपालिकेप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य नेमण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत प्रश्न विचारला असता, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही व्यवस्था केली जात आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण या स्वीकृत सदस्यांमध्ये दिव्यांगांना, अनाथांना किंवा विधवांना संधी दिली पाहिजे. फक्त आपला राजकीय ताळमेळ जुळवण्यासाठी ही व्यवस्था केली जात असेल तर चुकीचे आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

Gadchiroli Naxal Surrender: नक्षलवादाच्या इतिहासातील सर्वात मोठे आत्मसमर्पण !

महसूल मंत्र्यांना आपल्या राजकीय कार्यकर्त्यांची व्यवस्था करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य पाहिजे आहेत का? जो घटक तेथपर्यंत पोहोचू शकत नाही त्यासाठी ज्याची गरज असते, त्याच्यासाठी स्वीकृत सदस्य घ्यायला पाहिजे. पण या लोकांना राजकारणाशिवाय दुसरे काही सुचत नाही, हे आपले दुर्दैव आहे, असे म्हणत बच्चू कडू यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही निशाणा साधला.