Mahavikas Aghadi : ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट आर्थिक मदत द्या!

Protest Demanding Wet Drought : नांदुरामध्ये महाविकास आघाडीचे शेतकऱ्यांसाठी धरणे आंदोलन

Nandura नांदुरा तालुका “अंशतः बाधित” दाखवून शासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले. “ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी” या प्रमुख मागणीसह अन्य कृषकविषयक मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर माजी आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनावेळी जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की, नांदुरा तालुक्यातील सोयाबीन, उडीद, मुग, कापूस आणि तुर पिकांचे अतिवृष्टी व हुमणी अळीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Harshwardhan Sapkal : मनसेचा निर्णय इंडिया आघाडी घेणार, आमच्याकडे प्रस्ताव नाही

पूर्वीच्या शासन निर्णयानुसार तालुका “पूर्णतः बाधित” दाखविण्यात आला होता, मात्र १० ऑक्टोबर रोजी नव्या शासन निर्णयाद्वारे तो “अंशतः बाधित” दाखविण्यात आल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे.

महाविकास आघाडीने या निर्णयावर संताप व्यक्त करत म्हटले की, “सध्यास्थितीत शेतकरी मानसिक आणि आर्थिक संकटात सापडला असून, महायुती सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत आहे.”

निवेदनात नांदुरा तालुक्यास “पूर्णतः बाधित” घोषित करावे, सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करावी, पिकांचे प्रात्यक्षिक सर्वेक्षण करून विमा रक्कम थेट खात्यात जमा करावी,ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट आर्थिक मदत द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

Local Body Elections : झेडपीच्या मातब्बरांवर आली चाचपडण्याची वेळ !

या आंदोलनात माजी आमदार राजेश एकडे, वसंतराव भोजने (मा. जिल्हा प्रमुख, शिवसेना), मोहनराव पाटील (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट), भगवानराव धांडे (सभापती, कृ.उ.बा.सं.), रवि राणे, संजय चोपडे, नितीन मानकर, ईश्वर पांडव, लालाभाऊ इंगळे, संदीप बोचरे, मोहन गावंडे, पुरुषोत्तम झाल्टे, जयप्रसाद राजपूत यांच्यासह असंख्य शेतकरी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.