Demand to Give Anjangaon Board the Same Rate as Burhanpur : बुलढाण्यात केळी उत्पादकांचे प्रशासनाला निवेदन
Buldhana “केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे,” असा ठाम आवाज बुलढाण्यात रविव घुमला. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो केळी उत्पादक शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर एकत्र येत अंजनगाव बोर्डातील केळीला बुरहानपूर–रावेर बोर्डाच्या प्रमाणे दर देण्याची मागणी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.
तुपकर यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात शेतकऱ्यांनी सांगितले की, सध्या केळी उत्पादनाचा खर्च प्रति क्विंटल ३०० ते ५०० रुपये, तर एका झाडामागे सुमारे ८० ते ९० रुपये एवढा आहे. मात्र, बुरहानपूर बोर्डात केळीचा दर २६०० रुपये असताना अंजनगाव बोर्डात केवळ ५०० रुपये एवढा दर मिळतो. या तफावतीमुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चसुद्धा परत मिळत नाही, अशी व्यथा त्यांनी मांडली.
Opponent aggressive : मतदार याद्यांतील घोळ, दुबार मतदानावर विरोधक आक्रमक !
शेतकऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट सांगितले की, “बुरहानपूर–रावेरप्रमाणे दर न मिळाल्यास शेतकऱ्यांचा संघर्ष अधिक तीव्र होईल.” या मागणीला समर्थन देत तुपकर म्हणाले, “व्यापाऱ्यांची मनमानी व अंदाजे वजनाने केळी खरेदी करण्याची पद्धत थांबली पाहिजे. प्रत्येक किलोला योग्य दर मिळवून देण्यासाठी ‘अॅक्च्युअल वेट’ची सक्ती करा.”
Local Body Elections : सभापतीपद एसटीसाठी राखीव, पण सदस्यांमध्ये एकही एसटी जागा नाही!
या आंदोलनात आणखी एक महत्त्वाची मागणी पुढे आली – शेगाव येथे स्वतंत्र केळी बोर्ड स्थापन करण्याची. तुपकर म्हणाले, “आपल्या भागात केळी उत्पादन झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शेगावात स्वतंत्र बोर्डाची आवश्यकता निर्माण झाली आहे.” जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या चर्चेनंतर प्रशासनाने कृषी पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.