Farmers Affected by Excess Rainfall : चार लाख शेतकऱ्यांची दिवाळी हाेणार गाेड!

₹289 Crore 27 Lakh Aid to Be Deposited in Farmers’ Accounts : २८९ काेटी २७ लाख रुपयांची मदत येणार खात्यात

Buldhana सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. प्रशासनाने नुकसानाचे पंचनामे करून शासनाकडे २८९ काेटी २७ लाख रुपयांची मदत निधीची मागणी केली हाेती. जिल्ह्यातील ४ लाख ४ हजार ९०८ शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदतीची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे, नुकसानामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मदत निधी वितरणीत करण्याविषयी शासन आदेश जारी करण्यात आला आहे.

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. अनेक तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाउस झाला हाेता. त्यामुळे, नदी, नाल्यांना पूर आल्याने पिके वाहून गेली हाेती. साेयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते.खरीप हंगामातील ३ लाख २९ हजार १५० हेक्टरवरील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. तसेच १ हजार ३२२ हेक्टवरील बागायती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले हाेते. ३ हजार २२० हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले हाेते.

Farmers Affected by Excess Rainfall : शेतकऱ्यांच्या ताेंडाला पुसली पाने, सत्ताधारी भाजपनेच दिले प्रशासनाला निवेदन

या नुकसानाचे प्रशासनाने पंचनामे करून जिल्ह्यातील ४ लाख ४ हजार ९०८ शेतकऱ्यांसाठी मदत निधीची मागणी करण्यात आली हाेती. शासनाने जिल्ह्यातील ४ लाखांवर शेतकऱ्यांसाठी २८९ काेटी २७ लाख रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे. त्यामुळे, दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधी जमा हाेणार आहे. त्यामुळे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी टाकली आरोग्य सेवेत भर !

काेरडवाहू शेतीसाठी दाेन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर ८ हजार ५०० रुपये, बगायतीसाठी हेक्टरी १७ हजार आणि बहु वार्षिक पिकासाठी हेक्टरी २२ हजार ५०० रुपये अशी मदत मिळणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील ११ तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे.