व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण OBC Reservation : ओबीसींच्या हक्कांवर गदा, अन्यायकारक निर्णय मागे घ्या!

OBC Reservation : ओबीसींच्या हक्कांवर गदा, अन्यायकारक निर्णय मागे घ्या!

OBC Coordination Committee Holds Sit-in Protest : चिखलीत ओबीसी समन्वय समितीचे धरणे आंदोलन; सरकारला इशारा

Chikhali राज्य शासनाने ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात घेतलेल्या अन्यायकारक निर्णयाविरोधात आणि न्याय्य हक्कांसाठी लढा देण्यासाठी चिखली येथे जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन ओबीसी समन्वय समितीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर पार पडले.

२ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने घेतलेल्या ओबीसी समाजविरोधी निर्णयाचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी तो निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी केली. तसेच ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करून खरी वस्तुस्थिती उघड करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

Local Body Elections : जिल्हा परिषद निवडणुकीत आरक्षणाने उलथापालथ; अनेक दिग्गजांवर गट बदलण्याची वेळ

यावेळी वक्त्यांनी शासनावर टीका करत सांगितले की, “ओबीसींचे अस्तित्व आणि प्रतिनिधित्व अबाधित ठेवायचे असेल तर सरकारने निर्णय मागे घ्यावा, अन्यथा संघर्षाची धार अधिक तीव्र केली जाईल.” त्यांनी पुढे महाज्योती संस्थेला ‘अण्णासाहेब पाटील महामंडळा’प्रमाणेच समप्रमाणात निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली.

Farmers Affected by Excess Rainfall : चार लाख शेतकऱ्यांची दिवाळी हाेणार गाेड!

या आंदोलनात सुभाष देव्हडे, सतीश शिंदे, विजय खरात, अभय तायडे, विठ्ठल गंगे, राहुल चवरे, दीपक देशमाने (राजे), अशोक हिरवे, अशोक इंगळे, नाना सपकाळ, मोहन मेहेत्रे, सचिन भराड, प्रशांत जैवाळ, विलास घोलप, राकेश चोपडा, अनमोल ढोरे, विजय जागृत, प्रकाश सपकाळ, राजेश देशमाने, अंबादास खरात, नितीन फुलझाडे यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी झाले.

error: Content is protected !!