Navneet Rana : राज-उद्धव पैसा व खुर्चीसाठी एकत्र

Raj and Uddhav Come Together for Money and Power : नवनीत राणांचा आरोप, बच्चू कडूंवरही साधला निशाणा

Amravati माजी खासदार नवनीत राणांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर प्राथमिकीनेच टीका केली आहे. राणांच्या मते, राज्यातील राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे केवळ सत्ता आणि खुर्चीसाठी एकत्र आले आहेत. “ठाकरे परिवार हे मजबुरीचे दुसरे नाव झाले आहे,” असं त्यांनी म्हणत युतीवर भाष्य केले.

नवनीत राणा मंगळवारी आपल्या निवासस्थानी अंध, अपंग व कुष्ठरुग्रस्त बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि राणा दाम्पत्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. या पार्श्वभूमीवर राणांनी ठाकरे बंधूंवर तसेच प्रहार संघटनेचे माजी आमदार बच्चू कडूंवरही तीव्र टीका केली.

Help of farmers : शेतकऱ्यांची दिवाळी हाेणार गाेड

राणांनी सांगितले की, “कुटुंब एकत्र येणे ही आपली संस्कृती आहे, परंतु आज संपूर्ण महाराष्ट्र दोन भाऊ एकत्र पाहत आहे — ते कुटुंबासाठी नाही, तर फक्त सत्ता व खुर्चीसाठी. फक्त पैसा व तोड्या करण्यासाठी हे दोघे एकत्र आले आहेत.” त्यांनी ठाकरे परिवारावर ‘मजबुरीचे’ नाव लागल्याचेही निर्देश केले.

बच्चू कडूंवरील टीकेबाबत राणांनी म्हटले की, सध्या अनेक लोक नौटंकी करत आहेत आणि बाहेर जाऊन ‘आमदारांना मारून टाका’ अशी भाषा करतात. “पण तुम्ही चार वेळा आमदार होता आणि दोन वेळा मंत्रीही—त्या काळात शेतकऱ्यांसाठी तुमची पोटदुखी बाहेर आली नाही. अनेक लोक आज माजी झालेत कारण त्यांनी कधीच आपल्या खिशात हात टाकला नाही — फक्त इनकमिंग असायचे, आऊटगोइंग नव्हते,” असे त्या म्हणाल्या.

Mahavitaran : व्वाह रे सरकार! ४ वर्षांपासून शेतकऱ्यांकडे वीज नाही

राणांनी पुढे सांगितले की, “अचलपूरचे माजी आमदार कोट्यवधींची संपत्ती साठवून बसले आहेत. मी त्यांना अनेक वेळा धमकावले की, तुमची संपत्ती मला द्या, माझी संपत्ती तुम्ही घ्या. आता त्यांना एका शेतकऱ्याच्या मुलाने पराभूत केले आहे.” या वक्तव्यातून राणांनी स्थानिक राजकीय नेत्यांवरील आपले संताप व टीका अधोरेखित केली.