Babanrao Taywade : राजकीय पक्षांनी बोगस ओबीसींना उमेदवारी देऊ नये !

Political Parties Should Not Field Fake OBC Candidates : ओबीसींचा लढा समाजन्यायासाठी आहे, तो कायदेशीर आणि शांततामय मार्गानेच पुढे नेला जाईल

Nagpur : नांदेड जिल्ह्यात बोगस ओबीसींचा शिरकाव रोखण्यासाठी सकल मराठा – ओबीसी समाजाची एकत्र सभा प्राध्यापक मनोहरराव धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला विविध समाजघटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील ओबीसी आरक्षणावर आणि बोगस प्रमाणपत्रांच्या वाढत्या प्रकरणांवर या सभेत गंभीर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात बोगस ओबीसींचा शिरकाव होऊ नये म्हणून सहा ठराव एकमताने पारित करण्यात आले.

ओबीसी प्रमाणपत्र पडताळणी यंत्रणा मजबूत करण्याची मागणी, शैक्षणिक व नोकरीच्या क्षेत्रात खऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन, तसेच बोगस लाभार्थ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा आग्रह या ठरावांमध्ये नोंदवण्यात आला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी या ठरावांचे स्वागत केले. कुठल्याही राजकीय पक्षांनी बोगस ओबीसींना उमेदवारी देऊ नये, या ठरावाशी मी १०० टक्के सहमत आहे. मतदारांनीही बोगस उमेदवारांना मते देऊ नये आणि मुळ ओबीसींनाच पाठींबा द्यावा, या ठरावांनाही माझे समर्थन असल्याचे डॉ. तायवाडे आज नागपुरात (२५ ऑक्टोबर) पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Defender car case : एड्सग्रस्तांच्या अनुदानाचा गैरवापर केल्याचा गंभीर दावा

बोगस प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांची माहिती माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत मिळवून त्यांची जात पडताळणी रद्द करण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे किंवा न्यायालयात करता येते. चुकीच्या माहितीच्या आधारे मिळालेली प्रमाणपत्रे रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. त्यामुळे या सभेत पारित झालेल्या ठरावांना अत्यंत सकारात्मक आणि कायदेशीर दिशा असल्याचे बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केले.

Dr. suicide case: डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणात खळबळजनक आरोप

नांडेडमधील सभेला उपस्थित असलेल्या विविध गावांतील प्रतिनिधींनीही आपल्या मनोगतातून समाजातील एकजुटीचे दर्शन घडवले. नांदेड जिल्ह्यात ओबीसी आणि मराठा समाजाचे समन्वय आणि परस्पर सहकार्य या सभेत प्रकर्षाने जाणवले. हा लढा समाजाच्या न्यायासाठी आहे आणि तो कायदेशीर आणि शांततामय मार्गानेच पुढे नेला जाईल, असे प्रा. धोंडे यांनी सभेत सांगितले.