Vidarbha Farmers : शेतकरी पुत्रांचे झोपा काढा आंदोलन!

Farmers Protest for Soybean Procurement : सोयाबीन खरेदीसाठी ‘सरकार जागे व्हा’चा इशारा

Akola सोयाबीनची खरेदी आधारभूत किमतीवर तातडीने सुरू करावी, या मागणीसाठी शेतकरी पुत्रांनी शुक्रवारी पणन महासंघाच्या जिल्हा कार्यालयात झोपा काढा आंदोलन केले. निद्रिस्त सरकारी यंत्रणांना जागे करण्याच्या प्रतीकात्मक उद्देशाने हे अभिनव आंदोलन करण्यात आले.

या वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच सध्या खुल्या बाजारात सोयाबीनला केवळ साडेतीन ते चार हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किंमतीप्रमाणे प्रती क्विंटल ५ हजार ३२८ रुपयांना सोयाबीन खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Copy-Pest Politics : ‘काम शून्य, नक्कल फुल’, जोरगेवारांचा राजकीय फॉर्म्युला !

गहू, हरभरा, कांदा या रबी पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोने गहाण ठेवून पैसा उभा केला आहे. खुल्या बाजारातील कमी दरामुळे त्यांना मोठा तोटा सहन करावा लागत असल्याचे सांगून, हमीभावाने खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करावीत, अशी मागणी संभाजी ब्रिगेड युवक शाखेचे जिल्हाध्यक्ष रवी गावंडे यांनी केली.

आझाद फाउंडेशनतर्फे या संदर्भात जिल्हा पणन अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्याच कार्यालयात झोपून आंदोलन केले. या आंदोलनात गोपाल पोहोरे, देवानंद साबळे, योगेश ढोरे, अमोल जाधव, रवी गावंडे, अमोल माळी, गोविंदा मोरखडे, रामेश्वर पोहरे, निखिल ठाकरे आदी सहभागी झाले होते.

Suicide of Sampada Munde : संपदा मुंडेची आत्महत्या ओबीसी समाजासाठी हळहळजनक !

आझाद फाउंडेशनच्या मागण्या

हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी तातडीने सर्व खरेदी केंद्रे सुरू करावीत.

अतिवृष्टी आणि बुरशीमुळे डागाळलेल्या सोयाबीनचीही खरेदी करण्यात यावी.

खुल्या बाजारात सोयाबीन विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २ हजार रुपये अनुदान देण्यात यावे.

भावांतर योजनेची तत्काळ अंमलबजावणी करावी.

या मागण्या मान्य न झाल्यास, शेतकऱ्यांना गांजा उत्पादनाचे परवाने द्यावेत, अशी उपरोधिक मागणी करण्यात आली.