PWD : रस्त्याचे काम केले नाही, ग्रामस्थांनी रस्त्यावरच लावली बेशरमाची झाडे!

Villagers Plant Besharam Trees Right on the Road in Protest : ठेकेदाराचीही दिरंगाई, पातुर्ड्यात रखडलेल्या कामाचा अनोखा निषेध

Paturda पातुर्डा गावाजवळील जिल्हा परिषद हायस्कूल ते बसस्थानकदरम्यानचे रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले असून, या निकृष्ट व अपूर्ण कामामुळे वाहनधारक आणि प्रवासी हैराण झाले आहेत. शासनाने खांडवी, भेंडवळ, पातुर्डा, उकळी, नेर, नांदखेड, किनखेड, दर्यापूर, आसेगावदरम्यानच्या रा. म. २७८ मार्गाच्या सुधारणा कामाला मंजुरी दिली असली तरी ठेकेदार कंपनीकडून अत्यंत ढिलाईने काम सुरू आहे.

आरोग्य केंद्र ते शाळा दरम्यानचा रस्ता योग्य भराव न टाकता ओबडधोबड पद्धतीने करण्यात आल्याने पावसाळ्यात पाणी साचून प्रवाशांना व विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाल्या खोदून टाकल्या असल्या तरी त्यातील मलबा रस्त्यावरच टाकल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहतुकीत वारंवार खोळंबा निर्माण होत आहे.

Sangrampur Congress : हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पाळत ठेवल्याचा आरोप

या निष्क्रियतेविरोधात ग्रामपंचायत सदस्य कपिल गवई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्याच्या मधोमध बेशरमाचे झाड लावून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. या प्रतीकात्मक आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधले असून, नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

Ajit Pawar : अमरावती जिल्ह्यासाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर

ग्रामस्थांनी संबंधित कंत्राटदार कंपनी व प्रशासनाने तातडीने दर्जेदार रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.