Local Body Elections : भाजप–युवा स्वाभिमानचं गठबंधन ठरलं!

Alliance Finalized Between BJP and Yuva Swabhiman Party : प्रत्येक तालुक्यात २० सदस्यीय समिती स्थापन

Amravati युवा स्वाभिमान पक्षाची राष्ट्रीय, राज्य व जिल्हा कार्यकारिणीची संयुक्त बैठक पक्षाच्या मुख्य कार्यालयात पार पडली. आगामी नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत संघटन विस्तार, उमेदवार निवड आणि स्थानिक राजकीय समीकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान इच्छुक उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अर्जांवर चर्चा करून प्राथमिक निर्णय घेण्यात आले. तसेच विविध नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Local Body Elections : पाच नगराध्यक्षपदांसाठी चुरशीची लढत!

या बैठकीत भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षामध्ये गठबंधन करून आगामी निवडणुकांमध्ये संयुक्तपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत नगराध्यक्षपदासाठी भाजप तर नगरसेवकपदांसाठी युवा स्वाभिमान पक्ष उमेदवार उभे करणार आहे. निवडणुकीची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात २० पदाधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या समित्यांची घोषणा लवकरच केली जाणार आहे.

बैठकीस राष्ट्रीय अध्यक्ष नीलकंठराव कात्रे, ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील राणा, अँड. नंदेश अंबाडकर, जयंतराव वानखेडे, शैलेंद्र कस्तुरे, संजय मुनोत, कमलकिशोर मालानी, नीलेश कुलकर्णी, सत्यसिंग लोटे, प्रा. डॉ. अजय गाडे, जिल्हा अध्यक्ष सोनाली नवले, सुभेदार साहेब, अविनाश काळे, मनीष अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

NCP Sharad Pawar : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या

यावेळी अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चांदूरबाजार, चांदूर रेल्वे, चिखलदरा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरुड, धारणी व नांदगाव खंडेश्वर या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.