व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण NCP Sharad Pawar : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या

NCP Sharad Pawar : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या

Demand to conduct local body elections using ballot papers : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आग्रह, कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

Amravati “विधानसभेला मिळालेल्या मतांवर आमचा विश्वास नाही. लोकशाहीची पायमल्ली होत असून ही परिस्थिती फक्त एका मतदारसंघापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर दिसते. म्हणूनच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्यात, यासाठी ग्रामपंचायतींनी ठराव घेणे आवश्यक आहे,” असा ठाम सूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात निघाला.

शिवकृपा सभागृह, राजुरा बाजार रस्ता, वरुड येथे झालेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख, तर उद्घाटक म्हणून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून खा. अमर काळे उपस्थित होते.

Local Body Elections : नगराध्यक्षपदाच्या दावेदार वृषाली बोंद्रे यांचा ‘पत्ता कट’!

यावेळी बोलताना हर्षवर्धन देशमुख यांनी कार्यकर्त्यांना एकसंघ राहून आगामी निवडणुकांमध्ये लढाई लढण्याचे आवाहन केले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, “मुख्यमंत्री सातबारा कोरा म्हणतात; पण अजून काहीच झालेले नाही. २०१४ मध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, तेही अद्याप अपूर्ण आहे. परदेशातून ५५ लाख गाठी कापूस आयात होत असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. हे सरकार शेतकरीविरोधी असून त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.”

खा. अमर काळे यांनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. “भाजप खोटं बोलतो पण रेटून बोलतो; आता आपणही रस्त्यावर उतरून लढाईची तयारी ठेवली पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आजही काहीच झालेले नाही,” असे ते म्हणाले.

या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष अनिल जळमकर, महिला जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे, माजी सभापती गिरीश कराळे, श्रीपाद ढोमणे, प्रदीप कुन्हाडे, राजाभाऊ कुकडे, कमलाकर पावडे, मेघना मडगे, जगदीश काळे, रामदास धुर्वे, रशीद खान मुनीर खान, सय्यद गुफरान, सय्यद मीर रुस्तम अली, अब्दुल तमिजभाई आदी मान्यवर उपस्थित होते.

Local Body Elections : काँग्रेससमोर अस्तित्वाची लढाई, गाफील राहिल्यास पाणीपत अटळ !

दरम्यान, या मेळाव्यात देवेंद्र भुयार यांचे समर्थक ऋषिकेश राऊत आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रशांत धुर्वे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरदचंद्र पवार गट) जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन उर्जा निर्माण झाल्याचे वातावरण होते.

error: Content is protected !!