Who was in the rest room? Dada Garud’s video is out. : विश्रामगृहात कोण कोण होतं? दादा गरुडचा व्हिडीओ समोर
Parrali : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप गाजत असतानाच आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. जरांगे पाटील यांनी माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर थेट हत्येची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणात दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यातील एक संशयित दादा गरुड याचा कबुलीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये दादा गरुड स्वतः सांगताना दिसतो की, “परळीतील शासकीय विश्रामगृहात धनंजय मुंडे, कांचन मुंडे आणि अमोल खुणे हे सर्वजण उपस्थित होते. मीही तेथे होतो. त्यावेळी मी दुसऱ्या कामासाठी आलो होतो, पण या सर्व लोकांची एका खोलीत 25 मिनिटं चर्चा झाली,” अशी कबुली त्याने या व्हिडीओमध्ये दिली आहे. जरांगे पाटील यांनी याच विश्रामगृहातील बैठकीचा उल्लेख करत या घटनेवरून मोठे आरोप केले होते, आणि आता या व्हिडीओनंतर त्या आरोपांना नवं वळण मिळालं आहे.
BJP Politics : हंसराज अहिर यांना झटका; खंदे समर्थक प्रशांत समर्थ यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
या प्रकरणात अटक करण्यात आलेले दोन्ही संशयित दादा गरुड आणि अमोल खुणे हे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. जालना पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी अटक केली. अमोल खुणे हा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्या घराची सखोल तपासणी केली असून, चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अमोल खुणे यांच्या पत्नीने आपल्या पतीवरील सर्व आरोप फेटाळले आहेत. “माझ्या नवऱ्याला फसवण्यात आलं आहे. त्यांना दारू पाजून चुकीची कबुली घेतली गेली. माझे पती मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात एक अपशब्दही उच्चारू शकत नाहीत. त्यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत एका ताटात जेवण केले आहे,” असा दावा तिने माध्यमांसमोर केला.
Unhen landscam case : तेव्हा… पार्थ पवारांवरही गुन्हा दाखल करू” !
अमोल खुणे यांच्या कुटुंबीयांनीही या प्रकरणात पोलिसांकडून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. “माझा मुलगा अशा प्रकारचा कट करू शकत नाही. तो निरपराध आहे,” असं अमोलच्या आईने म्हटलं आहे.
जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर सांगितलं होतं की, त्यांच्या जीवावर उठल्याची माहिती त्यांना मिळाली असून, यामागे मोठे राजकीय कटकारस्थान असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांनी थेट धनंजय मुंडेंचं नाव घेतलं आणि त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप केला होता.
Pune land scam : एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांचे नाव घेत केला मोठा खुलासा !
या प्रकरणातील दादा गरुडचा व्हिडीओ आणि परळी विश्रामगृहातील बैठकीचे तपशील समोर आल्यानंतर प्रकरण आणखी गडद झालं आहे. राजकीय वर्तुळात याबद्दल प्रचंड चर्चा सुरू असून, राज्य सरकारवर निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीची मागणी वाढत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, जरांगे पाटील यांच्या या गंभीर आरोपांमुळे मराठा आरक्षण चळवळीचा राजकीय आयाम अधिकच तीव्र होऊ शकतो, आणि याचे परिणाम आगामी निवडणुकीत उमटू शकतात.
______








