Leaders Conduct Interviews of Aspirants candidates: नेत्यांनी घेतल्या नगराध्यक्षपदाच्या इच्छुकांच्या मुलाखती
Khamgao खामगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. योग्य उमेदवार निवडीसाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या खामगाव मतदारसंघाच्या पक्षनिरीक्षकांनी स्थानिक हॉटेल तुळजाई येथे नगराध्यक्षपद आणि नगरसेवकपदाच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.
खामगाव नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्याने भाजपातील महिला पदाधिकाऱ्यांमध्ये उमेदवारीसाठी चुरस वाढली आहे. नगराध्यक्षपदासाठी अनिता देशपांडे, भाग्यश्री मानकर, पप्पुशेठ अग्रवाल, अमोल अंधारे, पवन गरड, चंद्रशेखर पुरोहित यांसह अनेक इच्छुकांनी नेत्यांपुढे मुलाखती दिल्या.
Devendra Fadnavis : ‘नगराध्यक्ष आपल्याच पक्षाचा हवा’, मुख्यमंत्र्यांच्या सूचना
भाजपाच्या स्थानिक कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत नगराध्यक्षपदासाठी तब्बल १० अर्ज, तर ७० अर्ज नगरसेवक पदाच्या इच्छुकांकडून घेण्यात आले आहेत.
Local Body Elections : नामांकन दारात, इच्छुक गोंधळात! गुप्त बैठका वाढल्या
बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांना पक्षसंघटन मजबूत ठेवण्याचे आणि निवडणुकीत एकजुटीने लढण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, खामगाव नगरपरिषदेवर पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजप सज्ज असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले.








