Nitin Gadkari : वाद्यांच्या फ्यूजनची नागपूरकरांवर ‘संगीत मोहिनी’

Khasdar Sanskrutik Mahotsav Nagpur : ‘खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव-2025’चा तिसरा दिवस ठरला मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीतानुभवाचा

Nagpur खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव-2025’च्या तिसऱ्या दिवशी बासरी, सतार, तबला,ड्रम्स आणि विविध वाद्यांच्या फ्यूजनने नागपूरकरांवर संगीत मोहिनी घातल्याचे दृश्य दिसून आले. सुप्रसिद्ध बासरी वादक रोणू मुजुमदार यांनी तयार केलेल्या राग हंसध्वनीमध्ये ‘डांसिंग विथ द बीट’ च्या प्रस्तुतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि अक्षरशः संपूर्ण पटांगण परिसर फ्यूजन संगीतात न्हाऊन निघाला.

हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर ड्रम्स आर्टिस्ट गौतम शर्मा आणि नीलेश मोरे, सुप्रसिद्ध संगीतकार आणि जॅझ क्षेत्रात महारत असलेले अतुल रनिंगा, बेस गिटारवर हुकूमत असणारे प्रतिभावान संगीतकार मनीष कुलकर्णी, गायकी अंगाने सतार वाजविणारे स्वीकार कट्टी, लोकप्रिय संगीतकार मैसूर मंजुनाथ महादेवाप्पा, पद्मश्री आणि सुप्रसिद्ध बासरी वादक रोणू मुजुमदार यांनी कार्यक्रमाची संगीतमय सुरवात केली आणि त्यानंतर पॉप आणि रॉक प्रकारात तबल्यावर विशेष वर्चस्व असलेले बिक्रम घोष आणि अत्यंत प्रतिभावान आणि तालवाद्यांवर सरस असे तौफिक कुरेशी यांची त्यांना साथ लाभल्याने श्रोते-प्रेक्षक याना संगीताचा परमानंद मिळाला.

Local Body Elections : भाजपने रणशिंग फुंकले! बावनकुळे म्हणतात, ‘आम्हीच जिंकणार’

भारत रत्न पंडित रवीशंकर यांनी शिकविलेल्या राग कलावती मधील जनसंमोहिनी सम असलेले ‘बॅक टु द रुट्स’ ने तर प्रेक्षकांना सांगीतिक आनंदाच्या परमोच्च शिखरावर नेले. त्यानंतर झपतालमधील राग बागेश्रीच्या प्रस्तुतीने वातावरण भारावून गेले. बिक्रम आणि तौफिक यांच्या ‘रमता’ फ्यूजन ने सगळ्यांना चकित केले.

आजच्या कार्यकमाला केंद्रीय मंत्री व खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे प्रणेते मा. श्री. नितीन गडकरी, कांचनताई गडकरी, राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे, नामवंत सर्जन डॉ. मुजफ्फर लकडावाला, डॉ. हर्षवर्धन मार्डीकर, डॉ. मंजूषा मार्डीकर, उद्योगपती अतुल गोयल, हॉटेल सयाजीचे अनिल नायर, हॉटेल अशोकाचे संजय गुप्ता, एलआयसीचे नीलेश साठे, उत्तरप्रदेशचे विधायक श्री विपिन वर्मा या सर्वांनी दीपप्रज्वलन करून पारंपरिक पद्धतीने सुरवात झाली. रिचा सुगंध आणि बाळ कुळकर्णी, रेणुका देशकर यांनी सूत्रसंचालन केले.

महोत्सवाच्या यशस्वितेसाठी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्‍दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, डॉ. दीपक खिरवडकर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर, विजय फडणवीस, महेंद्र राऊत, दिलीप गौर, शैलेश ढोबळे यांचे सहकार्य लाभत आहे.

Local Body Elections : आजपासून धुमशान! न.पा.ची उमेदवारी ऑनलाइन; अनामत, प्रतिज्ञापत्र आवश्यक

‘जागर भक्तीचा’मध्ये रामरक्षा आणि मारुती स्तोत्र पठण

‘जय श्री राम’ आणि ‘जय हनुमान’ च्या गजराने आज मारुती स्रोत पठण आणि १३ वेळा रामरक्षा स्तोत्र पठणाचा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत ‘जागर भक्तीचा’ कार्यक्रमात रविवारी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात रामरक्षा आणि मारुती स्तोत्र पठणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शेकडोच्या संख्येने महिला पुरुष आणि युवक तसेच लहान मुलांनी यात सहभाग दर्शविला.
…..
आज महोत्सवात

सायं 6.00: स्‍थानिक कार्यक्रमात फिंगर आर्टीस्‍ट
सायं 6.30 : वंदनीय राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराजांवरील ‘राष्‍ट्रसंतांची जीवनगाथा’ हा दृक श्राव्‍य संगीतमय कार्यक्रम