Harshwardhan Deshmukh : एकसंघ राहाल तरच टिकाल, हर्षवर्धन देशमुखांचा निशाणा कुणावर?

Party Will Survive Only If You Stay United, Warns the Leader : स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा, सरकारवर टीका

Amravati वरुड येथील स्थानिक राजुरा बाजार रस्त्यावरील शिवकृपा सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) तर्फे कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात पक्षीय नेत्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका करत कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये एकसंघ राहून लढाई लढण्याचे आवाहन केले.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख होते. उद्घाटक म्हणून माजी गृहमंत्री अनिल देशमुख, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार अमर काळे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष अनिल जळमकर, महिला जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे, माजी सभापती गिरीश कराळे, श्रीपाद ढोमणे, प्रदीप कुऱ्हाडे, राजाभाऊ कुकडे, कमलाकर पावडे, मेघना मढगे, जगदीश काळे, रामदास धुर्वे, रशीद खान मुनीर खान, सय्यद गुफरान, सय्यद मीर रुस्तम अली, अब्दुल तमिजभाई, तालुकाध्यक्ष राजेंद्र बहुरूपी आणि शहराध्यक्ष डॉ. प्रवीण चौधरी आदींची उपस्थिती होती.

Ajit Pawar : “सिंचन घोटाळ्यातून फडणवीसांनी तुम्हाला बाहेर काढलं”

अध्यक्षीय भाषणात हर्षवर्धन देशमुख म्हणाले की, “विधानसभेला मिळालेल्या मतांवर माझा विश्वास नाही. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आहे. ही परिस्थिती केवळ एका मतदारसंघापुरती मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातच लोकशाहीची पायमल्ली होत आहे. म्हणूनच निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात,” अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी आमदार देवेंद्र भुयार यांचे खंदे समर्थक ऋषिकेश राऊत यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वात शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे भुयार गटाला ‘भगदाड’ पडल्याची राजकीय चर्चा सुरू आहे. तसेच काँग्रेसचे प्रशांत धुर्वे यांनीही या वेळी पक्षप्रवेश केला.

मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. मात्र, सध्याचे राज्य सरकार कर्जमाफीवर मौन बाळगून बसले आहे. “आता शेतकऱ्यांनीच निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री सातबारा कोरा म्हणतात, पण अजून काहीच झालेले नाही. धनगर समाजाला २०१४ मध्येच आरक्षण देऊ असे सांगितले होते, परंतु ते आजतागायत दिलेले नाही,” अशी टीका माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली.

Cabinet meeting : 5व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला !

“भाजप खोटे बोलतो, पण रेटून बोलतो. हेच राज्यातील महायुती सरकारचे धोरण आहे. त्यामुळे विरोधक म्हणून आपणही रस्त्यावर उतरून लढाईची तयारी ठेवली पाहिजे,” असे प्रतिपादन खासदार अमर काळे यांनी केले.