Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीने डाव टाकला!

Candidates for the Post of Mayor Announced : नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर; तळागाळातील नेतृत्वाला संधी

Akola राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजताच सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या नेतृत्वगुणांना वाव देण्याची परंपरा कायम ठेवत, पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळीही नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे.

माजी आमदार नातीकोदिन खातीब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणूक निर्णय समितीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. बाळापुर नगरपालिकेबाबत खतीब स्वतंत्र निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. अकोला जिल्ह्यातील विविध नगर परिषद व नगरपंचायतींसाठी पक्षाने उमेदवारांची घोषणा केली आहे.

https://sattavedh.com/local-body-elections-bjp-suffers-a-big-blow-from-chimur-junaid-khan-a-staunch-supporter-of-bunty-bhangadia-resig

बार्शीटाकळी नगरपंचायत : अख्तर खातून अलिमोद्दीन

मूर्तिजापूर नगरपरिषद : शेख इम्रान शेख खलील

अकोट नगरपरिषद : स्वाती मंगेश चिखले

तेल्हारा नगरपरिषद : विद्या सिद्धार्थ शामस्कार

या उमेदवारांची निवड करताना स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची सक्रियता, जनसंपर्क आणि सामाजिक कार्याचा अनुभव या निकषांचा विचार करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीने नेहमीच दलित, वंचित, अल्पसंख्याक आणि मागास समाजघटकांच्या प्रश्नांवर लढा दिला असून, यावेळीही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांच्या सहभागातून विकासाचे नवे मॉडेल सादर करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

पक्षाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, या उमेदवारांच्या माध्यमातून नागरिकाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा मानस आहे. स्थानिक समस्यांवर उपाय शोधणे, पारदर्शकता आणि जनसंपर्कावर भर देणारे प्रशासन हेच पक्षाचे ध्येय असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

या घोषणेमुळे अकोला जिल्ह्यातील निवडणुकीच्या समीकरणांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून, इतर राजकीय पक्षांच्या रणनीतीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीच्या या निर्णयामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Party symbol controversy : शिवसेना – राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद पुढे ढकलला

निवड समितीच्या बैठकीला खाती यांच्यासोबत प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, अरुंधती शिरसाट, प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे, राजेंद्र पातोडे, मिलिंद इंगळे, ज्ञानेश्वर सुलताने आणि आम्रपाली खंडारे यांची उपस्थिती होती.