व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Local Body Elections : बुलढाण्यात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

Local Body Elections : बुलढाण्यात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

Prestige of current and former MLAs is at stake in Buldhana : शिंदेसेना-भाजप युतीचा पेच कायम, आरोप-प्रत्यारोपांमुळे वाढली गुंतागुंत

Buldhana जिल्ह्याच्या राजकीय पटावर पुन्हा एकदा सत्तेची थरारक चुरस रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आता अधिकच बळकट झाली आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे शिंदेसेना-भाजप युतीचे गणित गुंतागुंतीचे झाले आहे. महाविकास आघाडी (काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना उ.), भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिंदेसेना अशी तिन्ही आघाड्या वेगवेगळ्या रिंगणात उतरतील, अशी दाट शक्यता आहे.

या निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, आणि शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड या तीन प्रभावशाली नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राजकीय समीकरणांचा गोंधळ वाढत असताना, सर्वच नेते स्वतःच्या गटाची पकड मजबूत करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरले आहेत.

Local Body Elections : चिखलीत पुन्हा ‘महाले विरुद्ध बोंद्रे’ सामना!

महाविकास आघाडीत काँग्रेसने सुरुवातीपासूनच समन्वय साधण्याची भूमिका घेतली होती. पक्षाचे स्थानिक सूत्रधार म्हणतात की, बुलढाण्यात काँग्रेसचा नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवार निश्चित झाला आहे, आणि पक्ष स्वतंत्रपणे ताकद दाखवेल. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली मविआचे कार्यकर्ते प्रचारासाठी सज्ज झाले आहेत.

गेल्या काही दिवसांत आ. संजय गायकवाड यांनी भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत वातावरण तापवले. “निष्ठावान भाजपसोबतच आमची युती राहील,” असे त्यांनी जाहीर वक्तव्य केले होते; मात्र या विधानानंतरच महायुतीत फूट पडल्याच्या चर्चेला उधाण आले. शिंदेसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांनी युतीबाबतची बैठक घेण्यासाठी भाजपकडे औपचारिक निमंत्रण पाठवले होते, तर आ. गायकवाड यांनी “शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करू” असे सांगून चर्चेला नवा रंग दिला.

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नुकतीच शेगावात शिंदेसेनेच्या नेते-पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. युतीबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी “शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करू, पण स्वबळाची तयारी ठेवा” असे सूचक विधान केले. त्यामुळे बुलढाण्यातील आघाडीचं चित्र आणखी अस्पष्ट झालं आहे. गुरुवारी चिखलीत जाधव, गायकवाड, माजी आ. शशिकांत खेडेकर आणि रायमुलकर सहा तालुक्यांच्या नगरसेवकांच्या मुलाखती घेणार आहेत — या बैठकीतूनही राजकीय संकेत मिळतील, अशी अपेक्षा आहे.

Anil Bonde : ‘आय लव्ह मोहम्मद’नंतर आता आणखी एक पोस्टर!

भाजपने दरम्यान आपले समीकरण वेगळ्या पद्धतीने मांडले असून, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि आरपीआय (आठवले गट) सोबत युती केली आहे. ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन बुलढाणा नगरपालिकेत लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजप कार्यकर्त्यांमध्ये मात्र प्रश्न चर्चेत — “शिंदेसेनेला खरोखर युती हवी आहे का, की फक्त हवा करण्यात येत आहे.

error: Content is protected !!