Delhi blast case : कारब्लास्टचा मुख्य आरोपी उमर मोहम्मदचे घर केले उद्ध्वस्त !

Security forces take strict action in Pulwama : पुलवामा येथे सुरक्षा दलांची कठोर कारवा

Pulwama : दिल्लीतील ‘लाल किल्ला’जवळ झालेल्या कार ब्लास्ट प्रकरणातील मुख्य आरोपी मानल्या जाणाऱ्या डॉ. उमर मोहम्मद याचे घर जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील गावात पोटकाच्या साहाय्याने उध्वस्तध करण्यात आले आहे. ही कारवाई भारतातील दहशतवादाविरोधातील कडक मोहिमेच्या अंतर्गत करण्यात आली आहे.

ही घटना कार बॉम्बस्फोटाशी थेट संबंधित आहे, ज्यात दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये जास्त प्रमाणातील स्फोट झाला होता आणि त्याचा तपास आता राष्ट्रीय आणि स्थानिक सुरक्षा दल मिळून करत आहेत.

Local Body Elections : नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून खामगावमध्ये सर्वेक्षण सुरू!

तपासादरम्यान हेही समोर आले आहे की, उमर मोहम्मद यांनी ‘व्हाईट-कॉलर टेरर मॉड्यूल’शी संवाद साधला होता, या मॉड्यूलमध्ये डॉक्टर, विद्यार्थी आणि अन्य व्यावसायिक सहभागी असल्याची माहिती मिळाली.

कारवाईनंतर सुरक्षा दलांनी त्या भागातील सर्व काही सुरक्षित केले असून, घराभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संबंधित वाहतुकीवरही निर्बंध ठेवण्यात आले आहेत. या प्रकारची कठोर कारवाई दहशतवादाविरोधातील धोरणात्मक पद्धतीचा भाग आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Local Body Elections : बुलढाण्यात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

या घटनेमुळे एकीकडे दहशतवादाविरोधी धोरणांत भारताची भूमिका ठळक झाली आहे, तर दुसरीकडे जम्मू-काश्मीर आणि दिल्लीदरम्यानची सुरक्षा स्थिती पुन्हा चर्चेत आली आहे.

______