Bihar CM : भाजप जेडीयू च्या यशानंतर एकच प्रश्न बिहारचा मुख्यमंत्री कोण?

Nitish or BJP leader? Fadnavis’ clear indication : नितीश की भाजपचा नेता? फडणवीसांचा स्पष्ट संकेत

Mumbai : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मोठ्या विजयाची नोंद केली असून भाजप–जेडीयू आघाडीने 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली. या प्रचंड यशानंतर संपूर्ण देशात एकच प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? नितीश कुमार की भाजपमधील एखादा नवा चेहरा? या चर्चेला अधिक वेग आला असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर थेट भूमिका स्पष्ट केली आहे.

फडणवीस म्हणाले की बिहारच्या जनतेने पुन्हा नितीश कुमार यांच्यावर विश्वास दाखवला असून एनडीएला मिळालेल्या विजयासाठी ते बिहारच्या जनतेचे आभार मानतात. चिराग पासवान आणि मांझी यांच्या पक्षांसह एनडीएची एकत्रित ताकद जनतेला पटली आणि त्याचेच प्रतिबिंब मतदानात दिसून आल्याचे ते म्हणाले. नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यावरचा विश्वास बिहारने पुन्हा दृढ केला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Maharashtra politics : बिहार निकालाच्या धामधुमीत महाराष्ट्रात अचानक राजकीय हालचाल !

त्याचबरोबर काँग्रेसवर टीका करताना फडणवीस यांनी राहुल गांधींवर थेट प्रहार केला. त्यांनी सांगितले की राहुल गांधींच्या ‘विषारी प्रचाराला’ बिहारच्या जनतेने ठाम उत्तर दिले आहे. संविधानिक संस्थांचा अपमान करण्याची काँग्रेसची सवय थांबलेली नाही आणि जोपर्यंत ते वास्तव स्वीकारत नाहीत, तोपर्यंत त्यांचे पतन सुरूच राहील, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसला सुनावले.

Sharad Pawar : आठवड्याभरात शरद पवारांना दोन मोठे राजकीय धक्के

दरम्यान, बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार या महत्त्वाच्या प्रश्नावर फडणवीसांनी स्पष्ट संकेत दिले. ते म्हणाले की नितीश कुमार यांच्या नेतृत्वातच ही निवडणूक लढवली गेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार मिळून घेतील. यावर भाष्य करण्याचा अधिकार त्यांना नाही आणि अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याआधी विनोद तावडे यांनीही याच भूमिकेची पुनरावृत्ती केली होती.

एनडीएला मिळालेला प्रचंड विजय आणि नितीश–मोदी यांच्या नेतृत्वावरचा जनतेचा विश्वास पाहता सध्यातरी नितीश कुमारच मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. मात्र औपचारिक घोषणा होईपर्यंत या चर्चेला आणखी रंग चढणार आहेत.

_____