district-wise distinct stance of the Vanchit Bahujan Aaghadi : कुठे काँग्रेससोबत युती, तर कुठे स्वतंत्र लढत, अमरावतीत काँग्रेसचा वेगळा ‘फॉर्म्युला’
Akola आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीनं (वंचित) तीनही जिल्ह्यांत वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असतानाच, बुलढाणा जिल्ह्यात मात्र काँग्रेससोबत आघाडी करण्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आजवर काँग्रेसवर टीकास्त्रांचा वर्षाव करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीनं अचानक बुलढाण्यात काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे बहुजन राजकारणात वंचितची भूमिका नक्की काय, हा प्रश्न चर्चेत आला आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं यापूर्वीही “नव्या मित्रपक्षांना” स्वीकारण्यात सावध भूमिका घेतली होती. मनसेला ‘चौथा घटक’ म्हणून स्वीकारण्यास नकार देणाऱ्या काँग्रेसनं, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वंचितसोबत आघाडी केल्याने महाविकास आघाडीतील इतर पक्षांत कुठला रुसवा निर्माण होतो का, हे लक्षवेधी ठरणार आहे.
Bihar Elections : अकोल्याचे आमदार व कार्यकर्त्यांनी प्रचार केलेल्या मतदारसंघात काँग्रेसचा विजय
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीनं अकोला जिल्ह्यातील चार मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. उर्वरित ठिकाणी स्थानिक विकासकेंद्रित पक्षांसोबत जाण्याचा विचार असल्याचे संकेत दिले आहेत. या निर्णयामुळे अकोला जिल्ह्यात कोणत्याही प्रमुख पक्षाची औपचारिक आघाडी होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.
अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं वंचित आघाडीसोबत न जाता, राजू गवई यांच्या पुत्र राजेंद्र गवळी यांच्या रिपब्लिकन पक्षासोबत हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे अमरावतीत काँग्रेसची स्वतंत्र राजकीय मांडणी आणि सामाजिक समीकरणांचा नवा प्रयोग पाहायला मिळत आहे.
Local Body Elections : नगरसेवक पदासाठी १६२ तर नगराध्यक्षपदासाठी १६ अर्ज दाखल
बुलढाण्यात काँग्रेससोबत वंचितची अधिकृत आघाडी जाहीर करण्यात आली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्रितरीत्या उमेदवार उभे करणार आहेत. या निर्णयामुळे बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय चित्र स्पष्ट झाले असून, भाजपाविरोधात काँग्रेस–वंचित एकत्र आल्याने बहुजन मतांमध्ये नवीन समन्वय साधला जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.








