Jitendra Awad reply to Ashish Shelar is in the news : जितेंद्र आव्हाडांचे आशिष शेलारांना दिलेले उत्तर चर्चेत
Mumbai: नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेल्या ‘महाविकास आघाडीचे तीन तेरा वाजतील’ या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काही दिवसांपूर्वी शेलार यांनी उरणमध्ये महायुतीच्या शक्तिप्रदर्शनावेळी ही टीका केली होती, ज्यावरून आता महाविकास आघाडीनेही हल्लाबोल सुरू केला आहे.
महाविकास आघाडीकडून उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भावना घाणेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी जितेंद्र आव्हाड, शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसचे स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना आव्हाड यांनी शेलारांच्या वक्तव्यावर कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली. “आशिषजी, गर्विष्ठाचे घर नेहमी रिकामं होतं. राजकारणात एवढा गर्व ठेवू नये. सूरज निकलता है तो रात को डुबता भी है, हे लक्षात ठेवा,” असे आव्हाड म्हणाले. त्यांच्या या प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत.
Udaynagar Grampanchayat : उदयनगरचे सरपंच मनोज लाहुडकर अपात्र घोषित
भावना घाणेकर यांनीही या वेळी आपल्या उमेदवारीबद्दल प्रतिक्रिया देताना उरण शहराचा विकास हा आमचा मुख्य अजेंडा असून नागरिकांनी विश्वास दाखवला तर शहराचा चेहरामोहरा बदलून दाखवू, असे सांगितले. या कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी आमदार मनोहर भोईर आणि काँग्रेसचे महेंद्र घरत यांची उपस्थिती होती.
दरम्यान, उरण नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप–महायुतीकडूनही अर्ज दाखल करण्याचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भाजप नेते आशीष शेलार यांच्या उपस्थितीत 22 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. नगराध्यक्षपदासाठी शोभा कोळी–शहा प्रथमच मैदानात उतरल्या आहेत. गणपती चौकातून निघालेल्या रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी शेलार यांनी महायुतीची मते या वेळी दुप्पट होतील आणि विरोधकांचे तीन तेरा वाजतील, असा दावा केला होता.
Zilla Parishad School : पालकांचा उद्रेक, शाळेला ठोकले कुलूप!
यंदाच्या निवडणुकीत भाजप–शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळणार असल्याने उरणची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे निश्चित झाले आहे.








