Raj Thackeray Emotional Post : बाळासाहेब स्मृतीदिनी राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

raj thackeray emotional post balasaheb anniversary uddhav raj meet : भाजप आणि शिंदे गटावर टीका, उद्धव–राज 11 वर्षांनी एकत्र स्मृतीस्थळी

Mumbai : शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या 13व्या स्मृतीदिनी दादरच्या स्मृतीस्थळावर शनिवारी एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुमारे 11 वर्षांनंतर एकाच वेळी बाळासाहेबांच्या स्मारकावर अभिवादन करण्यासाठी एकत्र दिसले. या भेटीने शिवसैनिक भावूक झाले, तर राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले.

याचदरम्यान राज ठाकरे यांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आणि त्याचबरोबर भाजप तसेच शिवसेना शिंदे गटालाही अप्रत्यक्ष कानपिचक्या दिल्या. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की “बाळासाहेबांसाठी हिंदुत्व हा विषय मतांसाठी नाही, तर अस्मितेसाठी होता.” बाळासाहेबांचा विचार चोरून घेतात; मतांसाठी हिंदुत्वाची मांडणी – राज ठाकरे

Local Body Elections : काँग्रेसला मोठा धक्का; प्रदेश काँग्रेसचे सचिव राजाभाऊ तिडके भाजपमध्ये !

पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात, “भाजपचा कमंडलवाद फोफावण्यापूर्वी हिंदूंची अस्मिता जागी करणारे बाळासाहेब होते. त्यांनी हिंदुत्वाला कधीच व्होटबँक म्हणून पाहिलं नाही. आज काही जण बाळासाहेबांची प्रतिमा चोरून स्वतःला हिंदुत्वाचे वारस म्हणवतात. ना त्यांना बाळासाहेब माहित, ना प्रबोधनकार; कारण ऐकणं-वाचनं यांचा दुष्काळ आहे.”

पुढे ते म्हणतात, “बाळासाहेब हे कट्टर हिंदूप्रेमी होते, पण त्यांची चिकित्सक वृत्ती कायम होती. त्यांनी आम्हाला समाजकारण आधी आणि नंतर राजकारण हा संस्कार दिला.” मनसेतर्फे त्यांनी बाळासाहेबांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.

Dr. Mohan Bhagwat : संघ स्वयंसेवकांच्या भावनिक शक्तीवर चालतो !

दुपारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दाखल झाले. यावेळी आदित्य ठाकरे, चंदू मामा तथा चंद्रकांत खोत आणि रश्मी ठाकरेही उपस्थित होते. दोन्ही बंधूंनी स्मारकासमोर काही काळ शांत बसून बाळासाहेबांना वंदन केले. उपस्थित शिवसैनिकांनाही हा क्षण भावूक करणारा होता.
गेल्या काही महिन्यांत ठाकरे कुटुंब एकत्र येण्याचे प्रसंग वाढले आहेत दिवाळी, भाऊबीज, कौटुंबिक भेटी सतत घडत आहेत. मात्र स्मृतीस्थळावर राज उद्धव एकत्र येणं हे 11 वर्षांनंतर प्रथमच घडले. या भेटीत दोघांमध्ये काहीवेळ संवादही झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पुढे ठाकरे कुटुंबातील नात्यांमध्ये आणखी गारवा येईल का, याची उत्सुकता वाढली आहे.

Municipal Corporation Election : महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची उमेदवार निवड प्रक्रियेला गती !

राज ठाकरे यांची पोस्ट आणि स्मृतीस्थळी झालेली भेट — दोन्हीची नोंद राज्याच्या राजकीय समीकरणात महत्त्वाची मानली जात आहे. विशेषत: हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या वारशावरून सुरू असलेल्या राजकीय स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर केलेले सूचक प्रहार लक्षवेधी ठरला आहे.

______