Quick disposal of appeals regarding nomination forms : बुलडाण्यात आठ सरकारी अभियोक्त्यांची नियुक्ती, प्रशासन सावध
Buldhana नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीत छाननीनंतर अपात्र ठरलेल्या उमेदवारांकडून दाखल होणाऱ्या अपीलांची प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी, न्यायालयीन कारभारात विलंब होऊ नये आणि निवडणुकीत अनावश्यक गोंधळ टळावा, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी तातडीने हस्तक्षेप केला आहे. त्यांच्या पुढाकारानंतर जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये आठ सरकारी अभियोक्त्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.
११ नगरपरिषदांच्या निवडणूक प्रक्रियेत १८ नोव्हेंबर रोजी छाननी झाली. काही उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यानंतर असंतुष्ट उमेदवारांनी अपील दाखल करण्याचे संकेत दिले. निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना अपिले जलदगतीने निकाली काढण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ७ नोव्हेंबर रोजी प्रभारी जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. व्ही. एल. भटकर यांना विशेष निर्देश पाठवले होते.
Local Body Elections : काँग्रेसने प्रभाग रिक्त ठेवला, अशांतभाई वानखेडे अविरोध विजयी
अपील प्रकरणांमध्ये सरकारी बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी पुढील सरकारी अभियोक्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे:
बुलढाणा जिल्हा न्यायालय
अॅड. एस. एम. खत्री
अॅड. एस. आर. सावजी
खामगाव अतिरिक्त जिल्हा न्यायालय
अॅड. यू. एस. आपटे
अॅड. ए. बी. इंगळे
मेहकर न्यायालय
अॅड. पी. टी. लाहूडकर
अॅड. ए. ए. केसाळे
मलकापूर न्यायालय
अॅड. व्ही. एम. बापट
अॅड. ए. पी. हिवाळे
ही नियुक्ती प्रभारी जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. भटकर यांनी १० नोव्हेंबर रोजी अधिकृतरीत्या केली असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली.
Local Body Elections : तब्बल ८६ अर्ज अपात्र; अध्यक्षपदाचा एक अर्जही बाद!
१९ ते २५ नोव्हेंबर — अपील निपटाऱ्याचा निर्णायक आठवडा
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार अपीलांची सुनावणी १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे.
प्रकरणे विविध न्यायाधीशांकडे वर्ग होणार
प्राथमिक सुनावण्या तत्काळ सुरू होतील
न्यायालयीन प्रक्रिया विलंब न होता जलदगतीने पार पडेल
पारदर्शक व गतीमान निवडणूक प्रक्रियेचा प्रशासनाचा प्रयत्न
नामांकन छाननीवरील वाद, संभाव्य अपिले आणि निवडणुकीतील तणाव लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने घेतलेली ही पावले निर्णायक मानली जात आहेत. या नियुक्त्यांमुळे न्यायालयीन सुनावण्या वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार असून निवडणूकीची पारदर्शकता अधिक मजबूत होईल.








