व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Local Body Elections : तब्बल ३५ वर्षांनी सानंदा परिवार नगरपालिका निवडणुकीतून बाहेर

Local Body Elections : तब्बल ३५ वर्षांनी सानंदा परिवार नगरपालिका निवडणुकीतून बाहेर

Not a single member is in the fray as a candidate from Sananda Family : खामगावचा ऐतिहासिक राजकीय बदल; एकही सदस्य उमेदवार म्हणून मैदानात नाही

Khamgao खामगावच्या राजकारणावर तीन दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या सानंदा परिवाराने यावेळच्या नगरपालिकेच्या निवडणुकीतून पूर्ण माघार घेतली आहे. ३५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच सानंदा घराण्यातील एकही सदस्य उमेदवार म्हणून मैदानात उतरला नाही. या निर्णयाने शहराच्या राजकीय समीकरणात मोठी खळबळ उडाली आहे.

नगरपरिषदेपासून ते विविध संस्थांपर्यंत खामगावच्या राजकारणात सानंदा नाव म्हणजे शक्तीचे प्रतीक मानले जात होते. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, नगराध्यक्ष म्हणून अलकादेवी सानंदा, अशोक सानंदा तर मागील पंचवार्षिकात अमेय सानंदा नगरसेवक निवडून आले. प्रत्येक पंचवार्षिकात किमान एक सानंदा निवडून येणे परंपरेसारखेच होते. परंतु यावेळी उमेदवारी यादीत ‘सानंदा’ हे नावच गायब आहे.

Local Body Elections : उमेदवारी अर्जावरील अपीलांचे जलद निपटारे

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) खामगावमध्ये सानंदा यांच्या नेतृत्वाखाली उतरली असून त्यांनी:

नगराध्यक्ष पदाचा उमेदवार
सर्व प्रभागांमध्ये नगरसेवक उमेदवार
यांची घोषणा केली आहे. मात्र एवढ्या मोठ्या नेतृत्वाच्या भूमिकेत असूनही, सानंदा कुटुंबातील कोणताही सदस्य स्पर्धेत नाही, हीच सर्वात मोठी राजकीय चर्चा ठरली आहे.

सानंदा परिवार जिथे मागे हटला आहे, तिथे खामगावच्या जुन्या प्रभावी घराण्यांपैकी बोबडे परिवार पुन्हा राजकारणात सक्रिय झाला आहे. गेल्या काही पंचवार्षिकात बोबडे घराणे निवडणुकांमध्ये नसले तरी यावेळी त्यांनी पुनरागमन केले आहे.

Local Body Elections : काँग्रेसने प्रभाग रिक्त ठेवला, अशांतभाई वानखेडे अविरोध विजयी

सानंदांचे ‘तीन दशकांचे’ राज्य—आणि अचानक बदल
सानंदांचा राजकीय प्रवास जवळजवळ ३५ वर्षांचा—
पहिल्यांदा ‘स्वस्तिक’ चिन्हावरून विजय
सलग पंचवार्षिक सत्ता
शहरातील प्रमुख संस्था, समाजकार्य संस्था यांच्यावर प्रभाव
आजवर प्रत्येक निवडणुकीत त्यांचा किमान एक सदस्य निवडून यायचा.
यावेळी मात्र संपूर्ण सानंदा घराणे स्पर्धेतून बाहेर — हा खामगावच्या राजकीय इतिहासातील मोठा बदल मानला जातो.

error: Content is protected !!