Maharashtra politics : अमित शाहांसमोर एकनाथ शिंदेंचा तक्रारींचा पाढा

Shah ended the discussion in a moment, signs of patch up in mahayuti : शाहांनी क्षणात चर्चा संपवली, महायुतीत ‘पॅचअप’ची चिन्हं

New Delhi : दिल्लीतील अचानक ठरलेल्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जवळपास तासभर भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात कल्याण डोंबिवलीसह अनेक भागांत राबवण्यात आलेल्या ऑपरेशन लोटसविषयी, तसेच भाजपकडून शिवसेनेचे माजी नगरसेवक फोडण्यात आल्याबाबत शिंदे यांनी तीव्र नाराजी शाहांसमोर व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिका, निर्णयांबाबतही शिंदेंनी विशेष तक्रारी मांडल्या असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीवर नेमण्यात आल्याने निर्माण झालेल्या असंतोषाचाही उल्लेख शिंदेंनी शाहांसमोर केला. दोन्हीकडील नाराजी, महायुतीतील ताण-तणाव आणि पक्षातील घडामोडी यांची मालिका शाहांना सविस्तर समजावून सांगितल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अमित शाह यांनी फक्त एकच वाक्य उच्चारत सगळा विषय एका झटक्यात आवरला “मला सगळं माहिती आहे आणि माझं या घडामोडींवर लक्ष आहे.” असे सांगत शाहांनी संपूर्ण तक्रार शांतपणे ऐकून घेतल्यानंतर दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे महायुतीतील अंतर्गत प्रश्नांवर वरच्या स्तरावरून लक्ष ठेवले जात असल्याचे संकेत मिळाले.

MLA Sajid Khan Pathan : डॉक्टर वेळेत येत नाहीत, कर्मचारी उपस्थित नाहीत, रुग्णांचे हाल

दिल्लीहून परतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना आणि पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण आदेश देत मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश लगेच थांबवण्याचे निर्देश दिले. भाजपने शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांना आपल्या गोटात घेतल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने त्यास उत्तर म्हणून मित्र पक्षातील नाराज पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याची रणनीती आखली होती. २२ नोव्हेंबरला काही प्रवेश सोहळे होणार होते, परंतु अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या चर्चेनंतर शिंदेंनी हे सर्व प्रवेश रोखण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Municipal Council Elections : धुळ्यात दोंडाई नगरपरिषद निवडणुकीत भाजपा नगराध्यक्ष बिनविरोध

महायुतीत वितुष्ट येईल असे कोणतेही पाऊल उचलू नका, असा स्पष्ट इशारा शिंदेंनी आपल्या नेत्यांना दिला आहे. ठाणे, रत्नागिरी, मराठवाडा, नवी मुंबई आणि रायगड येथील प्रवेशांना थांबा मिळाल्याने महायुतीमध्ये पुन्हा ‘पॅचअप’ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दिल्लीतील भेट, शाहांचे स्पष्ट संकेत आणि त्यानंतर शिंदेंनी दिलेले आदेश यामुळे शिंदे-भाजप समीकरणांवर नवे गणित तयार होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

—————————-