Breaking

Farmers will now get hi-tech facilities : शेतकऱ्यांना मिळणार आता हायटेक सुविधा !

Chief Secretary gave 100 days to implement ‘Agritech’ scheme : मुख्य सचिवांनी दिले ‘अॅग्रिस्टेक’ योजना राबविण्यासाठी १०० दिवस

केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अॅग्रिस्टॅक हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम येत्या १०० दिवसांत पूर्ण करा असे निर्देश राजाच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले आहेत.

राजाच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेत मंत्रालयात विविध विषयांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना, ॲग्रीस्टॅक आणि अनुभव पहल या योजना तसेच उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.

Nagpur municipal corporation: नागपूर मनपातील जुने रेकॉर्ड रद्द होणार

अॅग्रीटेक योजनेचे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदे होणार आहेत. पीएम किसान योजनेंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यक अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यात सुलभता येणार आहे. पीएम किसान योजनेंतर्गत पात्र सर्व लाभार्थी सामाविष्ट करून घेण्यास सहाय्य मिळणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळण्यास किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध होईल. तसेच कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करून घेण्यात सुलभता येणार आहे.

कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरणे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचविणे. यासाठी अॅग्रिस्टॅक फाउंडेशन तयार केले जात आहे. कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे, असे या बैठकीत सांगण्यात आले.

Shivsena Uddhav Balasaheb thakarey : शिवसेनेचे ‘एकला चलो’ छोट्या गावांमधून

जिल्हाधिकारी कार्यालयातून बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसमवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांच्यासह महसूल यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.