Local Body Elections : वंचितच्या उमेदवाराची माघार; शिवसेनेला मोठा दिलासा!

Vanchit candidate withdraws; a big relief for Shiv Sena : डॉ. संगीता हिरोळेंचा शिवसेना उमेदवार सौ. पूजाताई गायकवाड यांना जाहीर पाठींबा

Buldhana नगराध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या राजकीय चर्चेला आज मोठा वळण मिळाले. वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ. सौ. संगीता अर्चित हिरोळे यांनी आपला नामांकन अर्ज मागे घेत शिवसेना उमेदवार सौ. पूजाताई संजय गायकवाड यांना जाहीर पाठिंबा दिला. या निर्णयामुळे निवडणूक रिंगणात नवे समीकरण निर्माण झाले असून काँग्रेसचा हिरमोड झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
२४ नोव्हेंबर रोजी झालेल्या या घडामोडीला बुलढाणा नगरपालिका निवडणुकीतील ‘आजची सर्वात मोठी घटना’ अशी राजकारणात चर्चा झाली. शहरातील निवडणूक वातावरणाने अचानक तापमान घेतले असून शिवसेनेला या पाठिंब्यामुळे मोठी ताकद मिळाल्याचे मानले जात आहे.

Local Body Elections : विचित्र आघाड्या, अपक्षांचा हस्तक्षेप आणि तिरंगी लढत!

 

वंचितच्या उमेदवारीनंतर निर्माण झालेला राजकीय दबाव, विविध घटकांकडून व्यक्त झालेली नाराजी आणि स्थानिक पातळीवरील असमाधान लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आल्याचे हिरोळे कुटुंबीयांनी स्पष्ट केले. अमोल हिरोळे यांनी समाज बांधव आणि सामाजिक संघटनांसह शिवसेना उमेदवारांना पाठिंबा जाहीर करत पाठिंब्याचे पत्र आमदार संजय गायकवाड यांना सुपूर्द केले. शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.