Farmers will get ‘Unique Farmer ID’ : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती; ‘ॲग्रीस्टॅक’च्या संदर्भात बैठक
Nagpur जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत्या काळात युनिक फार्मर आयडी मिळणार आहे. शेतकऱ्यांचा आधार क्रमांक जोडून त्यास अद्वितीय शेतकरी ओळख क्रमांक मिळणार आहे. ॲग्रीस्टॅक उपक्रमाच्या माध्यमातून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जाणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भातील आतापर्यंत सर्व उपक्रमांमध्ये हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. देशातील प्रत्येक नागरिकाचा वेगळा आधार आयडी (क्रमांक) आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याचा एक युनिक फार्मर आयडी तयार केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या यूनिक फार्मर आयडी आणि त्यांच्या शेतजमिनीला Link करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
भविष्यात शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ याच युनिक फार्मर आयडीच्या माध्यमातून मिळणार आहे. येत्या काही दिवसांत महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने शेतकऱ्यांनी युनिक फार्मर आयडी तयार करून घेण्यात येणार आहे.
ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत तयार होणारे युनिक फार्मर आयडी भविष्यात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. पीएम किसान सन्मान योजनेचे अनुदान मिळविणे, किसान क्रेडिट कार्ड बनविणे, पीक विमा काढणे, त्या अंतर्गत परतावा मिळविणे यासाठी युनिक फार्मर आयडी आवश्यक ठरेल. याशिवाय सरकारने जाहीर केलेली पिकांची नुकसान भरपाई मिळविणे. कृषी विभागाच्या विविध योजना, सेवांचा लाभ मिळविणे. बाजारपेठेची माहिती, कृषी विषयक कामासंदर्भात कृषी तज्ञांचे मार्गदर्शन मिळविणे. यासाठी युनिक फार्मर आयडी आवश्यक ठरणार आहे. शेत जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी हे युनिक फार्मर आयडी आवश्यक ठरणार आहेत.
Central Government : अकोल्यातील पार्सल थेट पोहोचले अमेरिकेत!
लवकरच शिबिरांचे आयोजन
जिल्ह्यात यासंदर्भात शिबिरांचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी आधारशी मोबाईल नंबर लिंक केलेला नाही त्यांनी ते लवकरात लवकर करावेत. जेणेकरून फार्मर आयडी क्रिएट करताना अडचण येणार नाही.








