Varsha Meena : मंजुरी आली, पैसे आले, मग काम का होत नाही?

Collector angered over the laxity in farm road works : जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांवर भडकल्या; शेत रस्त्यांच्या कामातील ढिलाईवरून नाराजी

Akola शेत रस्त्यांच्या कामांची संथगती पाहून जिल्हाधिकारी वर्षा मीणा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “कामे मंजूर आहेत, निधी उपलब्ध आहे; मग गती का नाही?” असा थेट सवाल त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केला.

जिल्हाधिकारी वर्षा मीणा यांच्या दालनात अधिकारी–लोकप्रतिनिधींची आढावा बैठक झाली. पाणंद रस्त्यांच्या कामांवरून बैठकीत वातावरण तापले. जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १५८ रस्त्यांच्या कामांपैकी फक्त दोनच कामे पूर्ण झाली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

बैठकीसाठी स्पष्ट सूचना देऊनही जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गैरहजर राहिल्याचे लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले.

Local Body Elections : ‘त्या’ उमेदवारांना उच्च न्यायालयातूनही दिलासा नाही!

कामांच्या प्रगतीला गती देण्यासाठी गावनिहाय आणि रस्तेनिहाय आढावा घेणारी नियंत्रण समिती स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ही समिती प्रत्यक्ष स्थळी जाऊन कामांची तपासणी करणार असून, प्रशासकीय मंजुरी प्रलंबित असलेल्या कामांना तातडीने मंजुरी देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा आणि शेतकऱ्यांना सुलभ दळणवळण मिळावे म्हणून मंजूर केलेली कामे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण केली पाहिजेत, असा आग्रह लोकप्रतिनिधींनी केला. बैठकीस अनिल गावंडे, चंदू खडसे, अंबादास उमाळे, गणेश लोड, संजय कोरडे, शरद पाटील, संजय गावंडे, अतुल भाकरे, किशोर काकडे, रुपेश गावंडे, हर्षल गोंडचवर, वैभव तराळे, आशिष देशमुख आदी उपस्थित होते.

Food and Drugs Department : जिल्ह्यात रेशनमधून निकृष्ट तांदूळ-ज्वारीचे वितरण

कामे मंजूर… पण प्रगती शून्य!

२०२२ – ४१ कामे (५६.५० किमी)
२०२३ – ४८ कामे (७६.२० किमी)
२०२४ – ५ कामे (६ किमी)
२०२५ – ६४ कामे (७३ किमी)

एकूण : १५८ कामे – २११.७० किमी
पूर्ण : फक्त २ कामे