Amit Shah remove Shinde group, Sanjay Raut in the field after a month : शिंदे गटाचा कोथळा अमित शाह काढणार महिनाभरानंतर संजय राऊत मैदानात
Mumbai : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तब्बल एक महिन्यानंतर पुन्हा माध्यमांसमोर आले आणि विविध मुद्द्यांवर सविस्तर भाष्य करून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून काढले. गंभीर आजारावर उपचार घेत असताना ते सार्वजनिक जीवनापासून दूर होते. “तब्येत सुधारते आहे, उद्धव ठाकरे यांचं माझ्यावर बारीक लक्ष आहे. उपचार कठोर आहेत पण पूर्णपणे बरा होईन याची खात्री आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपली प्रकृती सुधारत असल्याची माहिती दिली. पत्रकार परिषदेत राऊत यांनी सुरूवातीलाच शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करत “लक्ष्मी दर्शन होणार अशी भाषा केली जात आहे, निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी,” अशी मागणी केली.
सांगोला येथील माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर भरारी पथकाच्या कारवाईबाबत राऊत म्हणाले की, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये पैशाचा इतका मोठा खेळ कधी झाला नव्हता. पूर्वी या निवडणुका केवळ स्थानिक पातळीवर लढल्या जात होत्या, परंतु आता 5 ते 6 हेलिकॉप्टर आणि खाजगी विमानांचा वापर होतो आहे. सत्तेतले तीन पक्ष एकमेकांविरुद्ध उभे आहेत आणि कोट्यवधी खर्च करून स्वतःमध्येच हाणामारी चालली आहे, असा आरोप करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह चिन्ह उपस्थित केले. शिंदे यांना लक्ष्य करत, “त्यांचा कोथळा अमित शाह काढणार, हे लिहून ठेवा. ते आमचा कोथळा काढायला निघाले होते. शिंदे गटातील 35 आमदार तुटणार. रवींद्र चव्हाण यांची भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती याच हेतूसाठी आहे,” असा आरोपही राऊत यांनी केला. “त्यांना वाटतं दिल्लीतील दोन नेते त्यांच्या पाठीशी आहेत; पण ते कोणाचेच नाहीत,” अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
फक्त पैशाच्या बळावर राजकारण टिकत नसल्याचे नमूद करत राऊत म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून महाराष्ट्राने नेतृत्व पाहिले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा होती, पण त्यांचे राजकारण शिंदे यांना कळत नसेल तर त्यांनी ते करू नये. “फक्त पैशावर राजकारण चालत नाही,” असे म्हणत त्यांनी शिंदे–फडणवीस सरकारवर थेट हल्लाबोल केला.
Municipal Elections : 22 नगरपरिषदांच्या निवडणुका अखेर पुढे ढकलल्या !
आगामी स्थानिक निवडणुकांत ठाकरे बंधू एकत्र येणार का या प्रश्नावर संजय राऊत यांनी सकारात्मक संकेत दिले. शिवसेना आणि मनसे यांच्यात जागावाटपावर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट होतात आहे. राज ठाकरे यांनी निवडणुकांसंदर्भात सादर केलेली पोट उद्धव ठाकरे यांना आवडले. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही,” असे राऊत म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी आरोप केला की, नरेंद्र मोदी, अमित शाह आणि गौतम अदानी हे त्रिकूट मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि उद्धव–राज ठाकरे यांची एकजूट हा प्रयत्न हाणून पाडेल.
Sudhir Mungantiwar :मुनगंटीवारांनी धमाकेदार घोषणा करत मुलवासियांना दिला दिलासा
महाविकास आघाडीतील काँग्रेससोबतच्या चर्चेबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, संवाद सुरू आहे. “काँग्रेसला बिहारच्या पार्श्वभूमीवर आत्मविश्वास वाढला असेल आणि ते मुंबईत स्वतंत्र लढायचे ठरवत असतील तर त्यांचे स्वागत आहे. पण आमची भूमिका स्पष्ट आहे मुंबईत महाविकास आघाडी टिकायला हवी.” शिवसेना – मनसे एक झाल्यास भाजपचा पराभव निश्चित असल्याचा ठाम दावा करत राऊत म्हणाले, “मुंबईचा खरा शत्रू भारतीय जनता पक्ष आहे. गौतम अदानीच्या हातात मुंबई दिली जात आहे. हे थांबवायचे असेल तर राज ठाकरे यांचे सोबत असणे ही मुंबई आणि महाराष्ट्राची गरज आहे.”
महिनाभराच्या शांततेनंतर संजय राऊत पुन्हा राजकीय मैदानात परतल्याने राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठ्या उलथापालथीची चिन्हे दिसू लागली आहेत. शिंदे गटावर केलेल्या थेट हल्ल्यामुळे आगामी निवडणुकांत राजकीय घडामोडी आणखी वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.








