Request for help for daughter’s marriage and unique promise of ‘Kalyan Mandapam’ to Mul : महिलांच्या अडचणींना थेट उत्तर देत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मूलवासियांना दिले ‘कल्याण मंडपम्’चे आश्वासन
Chandrapur : “एका महिलेला मुलीच्या लग्नासाठी १५ हजारांची मदत दिली. ‘एवढ्या रकमेने काय होणार?’ विचारलं तर ती म्हणाली ‘मंगल कार्यालयाचं भाडं द्यायचं आहे.’” या छोट्याशा अनुभवाचा उल्लेख करत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मूल शहरातील महिलांसाठी मोठी आणि थेट दिलासा देणारी योजना जाहीर केली.
विवाह सोहळ्यांवरील वाढत्या खर्चाचा विचार करून मुनगंटीवार म्हणाले की, मूलच्या महिलांना आता मंगल कार्यालयासाठी कुणाकडे हात पसरावा लागणार नाही. किरणताई कापगते यांना विजय मिळाल्यानंतर मूल शहरात तब्बल २ एकर जागेत भव्य ‘कल्याण मंडपम्’ उभारले जाईल, आणि या मंडपाचे भाडे फक्त ₹५०० रुपये असेल.
टाळ्यांनी दणाणले सभागृह..
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मूल शहरातील विविध प्रभागांत घेतलेल्या मुनगंटीवार यांच्या अनेक सभांना महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. सभेतल्या त्यांच्या भाषणातील ‘कल्याण मंडपम्’ या प्रस्तावाने महिलांच्या आशा पल्लवित झाल्या आणि घोषणेला क्षणार्धात टाळ्यांचा आणि आनंदाचा वर्षाव झाला. महिलांचा वाढता उत्साह आणि सभांना मिळणारा पाठिंबा यामुळे मुनगंटीवारांनी या निवडणुकीत महिलांची निर्णायक भूमिका अधोरेखित केली.
Sudhir Mungantiwar : उशिराने उमजले वास्तव , चंद्रपूरचे खासदार म्हणून मुनगंटीवारांचीच गरज होती!
दिला शब्द केला पूर्ण
मुल येथील सभेत भाषण करताना त्यांनी आपल्या कार्यपद्धतीचा उल्लेख करत सांगितले की, “मी राज्याची तिजोरी हाताळलेला माणूस आहे. कुठून आणि कसा निधी आणायचा, याचा पासवर्ड मला माहिती आहे. लोकांच्या कामासाठी विधानसभेत नेहमी स्पष्ट आणि निःसंकोचपणे बोलतो. त्यामुळे विकासाची पूर्ण गॅरंटी मी देतो.”
त्यांनी मूल नगरपरिषदेची सद्यस्थिती उघड करत सांगितले की नगरपालिका ५ कोटी १७ लाखांहून अधिक तोट्यात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत इशारा दिला की,
विरोधक चुकीनेही निवडून आले तर मालमत्ता कर दुपटीने–तिपटीने वाढवतील.
Sudhir Mungantiwar : ५३२ जीवनांना नवा प्रकाश: मुनगंटीवारांचा उपक्रम ठरला सेवाभावाचा दीप !
..तर मालमत्ता कर वाढणार नाही
नागरिकांना थेट संबोधित करत त्यांनी भविष्यासाठी स्पष्ट आश्वासन दिले की, “पुन्हा एकदा कमळाला समर्थन दिल्यास मालमत्ता कर वाढू दिला जाणार नाही. मूल शहराचा आर्थिक भार आम्ही उचलू, नागरिकांना उचलू देणार नाही.”
Sudhir Mungantiwar : लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसीसाठी ३० दिवसाची मुदतवाढ द्या
भाजप उमेदवारांसह नागरिकांची मोठी उपस्थिती..
सभांना नगराध्यक्ष पदाचे भाजपाचे उमेदवार प्रा. डॉ. किरण कापगते, पक्षाचे पदाधिकारी, विविध प्रभागांतील भाजप उमेदवार आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मुनगंटीवार यांच्या घोषणेनंतर सभांत नव्या उमेदवारीला आणि आगामी विकास योजनांना मिळणारा उत्साही प्रतिसाद लक्षवेधी ठरला.








