Pankaja Munde : आम्हाला बहीण-भाऊ म्हणणं बंद करा… आम्ही गंभीर नेते !

Pankaja Munde’s sensational statement during the election campaign : निवडणूक रणधुमाळीत पंकजा मुंडेंचे खळबळजनक विधान

Mumbai : नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा तुफान प्रचार संपल्यानंतर राज्यभरात आज मतदानाची प्रक्रिया सुरू असताना, परळीतून मोठ्या राजकीय चर्चेला तोंड फुटालेले आहे. बीड जिल्ह्यातील प्रचारादरम्यान मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंविषयी बोलताना केलेले विधान प्रचंड गाजत आहे. “आम्हाला बहीण-भाऊ म्हणणं बंद करा, आम्ही बहीण-भाऊ आहोतच… पण आम्ही फक्त बहीण-भाऊ नाही, तर गंभीर राजकारण करणारे दोन नेते आहोत,” असे वक्तव्य करत पंकजा मुंडे यांनी राजकीय समीकरणांमधील बदल स्पष्टपणे मांडले. युतीतील समन्वय आणि राजकीय व्यवहारिकता यांच्याशी संबंध जोडत त्यांनी या वक्तव्याने वैयक्तिक नात्यापेक्षा राजकीय ओळख पुढे ढकलण्याचा संदेश दिला आहे.

पंकजा मुंडे मागील दोन महिन्यांपासून परळीत मुक्कामी राहून निवडणुकीचा संपूर्ण प्लॅन तयार केल्याचे सांगितले. “मुंबईत कॅबिनेटची एक बैठक सोडली तर दोन महिन्यांपासून इथेच आहे; नगरपरिषदेचा संपूर्ण ब्ल्यूप्रिंट मी स्वतः तयार केल्या, जनता आम्हाला साथ देईल आणि यावेळी मोठ्या फरकाने विजय होईल,” असे त्यांनी आत्मविश्वासाने म्हटले. मतदान शांततेत पार पाडावे, जनतेला निवड करण्याचा अधिकार अबाधित राहावा यावर भाष्य करत त्यांनी प्रशासन आणि पोलिसांनी कुठलीही अडचण होऊ न देता कडक कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

Eknath Shinde Cash Bag : एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यात ‘पैशांच्या बॅगा’ प्प्रकरणाने खळबळ

धनंजय मुंडेंशी ‘बहिण-भाऊ’ नात्याचा मुद्दा उपस्थित झाल्यावर पंकजा मुंडेंनी कडवे शब्द वापरत म्हटले, “त्यांना त्यांचा पक्ष आहे, मला माझा पक्ष आहे. राज्यभर अनेक ठिकाणी युतीच्या राजकीय समीकरणांत आम्ही एकत्र आलो आहोत ते नात्यामुळे नाही तर राजकारणामुळे. 20 ते 22 वर्षे आम्ही पूर्णपणे राजकारणात झोकून दिलेले आहोत. म्हणून आम्हाला फक्त ‘बहिण-भाऊ’ म्हणून संबोधू नका, आम्ही सिरीयस लीडर्स आहोत.”

Devendra fadnavis : ‘ही पद्धत योग्य नाही’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

खूनाच्या कटासंबंधी चर्चांवर विचारले असता त्यांनी थेट उत्तर देण्यास नकार दिला. “कोणीही काही बोललं तर मी त्यावर टीका करत नाही, अशा भद्र गोष्टी माझ्यापर्यंत कधी येत नाहीत आणि मला अशा चर्चा आवडत नाहीत. जे ज्यांच्याशी संबंधित आहे त्यांनी त्याचे उत्तर द्यावे,” असे म्हणत त्यांनी मुद्द्यावर पडदा टाकला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे सापडल्याच्या प्रकरणांबाबतही प्रतिक्रिया टाळत निवडणूक आयोगच कारवाई करेल असे त्यांनी सांगितले.

Nagar Parishad Elections 2025 : राज्यभर मतदानाला ठिकठिकाणी ब्रेक !

परळीत या निवडणुकीत प्रथमच दोन्ही मुंडे कुटुंबातील नेते युतीत असले तरी मतदारांमध्ये नात्यापेक्षा राजकीय ओळख मजबूत करण्याचा प्रयत्न पंकजा मुंडेंच्या वक्तव्यातून प्रकर्षाने दिसून आला आहे. हे विधान मतदानाच्या दिवशी समोर आल्यामुळे त्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होत असून, आजच्या निकालानंतर या वक्तव्याचे परिणाम किती प्रभावी ठरतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

___