व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Bogus voting : बुलढाण्यात बोगस मतदान कांड! आमदारपुत्रावर कारवाईची विरोधकांची मागणी

Bogus voting : बुलढाण्यात बोगस मतदान कांड! आमदारपुत्रावर कारवाईची विरोधकांची मागणी

Opposition demands action against the MLA’s son : व्हायरल व्हिडिओनं तापलं राजकीय वातावरण, “गुन्हा दाखल करा, निवडणूक रद्द करा”ची मागणी

Buldhana नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या फक्त दोनच तासांत बुलढाणा शहरात बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली. पकडलेल्या बोगस मतदाराला मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात येत असतानाच, आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने त्याला पळून जाण्यास मदत केली, असा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच वातावरण तापलं.

यापूर्वीही प्रभाग १५ मधील गांधी शाळा केंद्राजवळ दोन बोगस मतदार पकडल्याचा व्हिडिओ समोर आला होता. दोन्ही प्रकरणांनी राज्यभर खळबळ उडवत बुलढाण्यात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार कार्यरत असल्याचे चित्र समोर आणले.

Mid-day meal : शालेय पोषण आहार कामगारांचे ७ डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन

मतदानादरम्यान पकडलेल्या बोगस मतदाराला कथितरीत्या पळवून लावल्याच्या आरोपावरून काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी आमदारपुत्र कुणाल गायकवाड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे.

काँग्रेस नेते रोहित पवार व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्हिडिओ शेअर करत निषेध व्यक्त केला. काँग्रेस उमेदवार लक्ष्मीताई काकस यांचे पती दत्ता काकस यांनीही “पोलिसांना धमकावून बोगस मतदाराला पळवणारा हा प्रकार गंभीर आहे; लगेच गुन्हा दाखल करा” अशी मागणी केली.

Local Body Elections : ३५ टक्के ‘लाडक्या बहिणी’ घराबाहेर पडल्याच नाहीत

भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनीही कठोर प्रतिक्रिया देत म्हटले की, “बोगस ओळखपत्र, शासकीय कामात अडथळा, पोलिसांना धक्काबुक्की करून बोगस मतदाराला पळू देणे हे गंभीर गुन्हे आहेत. दोषींवर कारवाई करा; गरज पडल्यास त्या प्रभागातील निवडणूक रद्द करा.”
या सर्व प्रकरणावर आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना निवडणूक आयोगावरच निशाणा साधला. ते म्हणाले— “बोगस मतदानावर नियंत्रणासाठी मीच एसपींना सकाळी सांगितलं. हजारो बोगस नावं मतदार यादीत आहेत. एवढी नावं काढण्यात आयोग अपयशी राहिला. आयोगासारखा नालायक विभाग नाही.” त्यांनी पुढे म्हणत, जर काही बोगस मतदानाचे प्रकार घडले असतील, तर योग्य कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी, असेही मत व्यक्त केले.

error: Content is protected !!