Breaking

Zilla Parishad Nagpur : आमचे सेटिंग नव्हते म्हणून निधी मिळाला नाही !

 

We didn’t get the funding lack of political setting : जिल्हा परिषद सदस्यांनी मांडला ‘पॉलिटिकल’ वजनाचा मुद्दा

Nagpur जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्यांचा कार्यकाळ शुक्रवारी संपत आहे. पण असे असतानाही सदस्यांना त्यांच्या सर्कलमधील तीर्थक्षेत्र विकास व ३०/५४ चा निधी मिळालेला नाही. विकासकामांतदेखील मोठ्या प्रमाणात राजकारण होत आहे. राजकीय सेटिंग नसल्यानेच निधी मिळाला नसल्याची खंत काही सदस्यांनी मांडली आहे.

बांधकाम समितीच्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास व ३०/५४ च्या १० कोटींच्या निधीचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. बांधकाम समितीच्या सभापती व उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी प्रस्तावित कामे मार्गी लावण्याचे निर्देश दिले; परंतु दोन दिवसांनी कार्यकाळ संपत असल्याने अधिकारी निर्देशाचे पालन करण्याची शक्यता दिसत नाही.

Pramod Manmode : उद्धवसेनेच्या कार्यालयाकडे जिल्हाप्रमुखाचीच पाठ

३०-५४ हा निधी जिल्हा परिषदेच्या विकासकामांसाठी खर्च केला जातो. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येतो; परंतु शासनाने हा निधी न दिल्याने विकास कामे ठप्प असल्याचे चित्र आहे. आधीच ५०:५४ लेखाशीर्ष अंतर्गत इतर जिल्हा मार्ग मजबुतीकरणासाठी नियोजन करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेचा आहे. पण असे असताना ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जातात.

Indian Railway Ministry : जनतेनेच घेतला फॉलो-अप; रेल्वेची ऐतिहासिक कामगिरी!

यात प्रामुख्याने आमदारांनी शिफारस केलेल्या कामांचा समावेश असतो. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत इतर जिल्हा मार्ग मजबुतीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्याला विरोध दर्शविला होता. परंतु या विरोधाला न जुमानता ही कामे जिल्हा परिषदेमार्फत न करता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जात आहेत.