Teacher’s Constituency : जिल्ह्यातील 8055 अर्ज पात्र; दावे व हरकतींसाठी 18 डिसेंबरपर्यंत मुदत

8,055 applications in the district are eligible : अमरावती शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी जाहीर

Buldhana अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. ही मतदार यादी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिल कार्यालयात प्रसिध्द करण्यात आली असून सर्व मतदारांनी या मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे, असे आवाहन सहा. मतदार नोंदणी अधिकारी, अमरावती शिक्षक मतदार संघ विभाग अमरावती तथा जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी केले आहे.

शिक्षक मतदारसंघासाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्यासाठी 1 जानेवारी 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याकरीता मा.भारत निवडणूक आयोगाने कार्यक्रम घोषित केला आहे. अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी 1 जानेवारी 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्यामध्ये सर्व पात्र शिक्षक मतदारांना नव्याने नाव नोंदणीकरीता अंतिम दि. 6 नोंव्हेबर 2025 पर्यंत होती.

PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेमध्ये मोठ्या घोटाळ्याचा संशय?

दिलेल्या कालावधीत नोंदणी साठी प्राप्त झालेल्या अर्जाची नोंदणी करून दि. 3 डिसेंबर 2025 रोजी शिक्षक मतदार संघाची प्रारुप मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तहसिल कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सर्व मतदारांनी मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे.

ही प्रारुप मतदार यादी जाहीर केल्यानंतर 18 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त झालेले दावे व हरकती दि. 5 जानेवारी 2026 पर्यंत निकाली काढण्यात येईल तसेच अंतिम मतदार यादी दि. 12 जानेवारी 2026 रोजी प्रकाशित होणार आहे. या पुनर्रिक्षण कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्यातून एकूण 8648 अर्ज प्राप्त झालेले असून त्यापैकी 8055 अर्ज पात्र ठरले आहेत.

OBC Reservation : हिवाळी अधिवेशन संपताच जंतर–मंतरवर धडकणार ओबीसी !

593 अर्ज अपात्र घोषित करण्यात आले आहेत. शिक्षक मतदारसंघ प्रारुप मतदार यादीमध्ये काही आक्षेप असतील तर वेळेत दाखल करण्याचे आवाहन सहा. मतदार नोंदणी अधिकारी, अमरावती शिक्षक मतदार संघ विभाग अमरावती तथा जिल्हाधिकारी डॅा. पाटील यांनी केले आहे.