Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींच्या मदतीला अंगणवाडी ‘ताई’!

Documents required for e-KYC will have to be submitted : ई-केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागणार

Buldhana लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसीची अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली असून ओटीपी न मिळाल्याने अडचणीत सापडलेल्या असंख्य महिलांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. पती, वडील किंवा मुलांच्या आधार क्रमांकावर ओटीपी उपलब्ध न झाल्याने अनेक लाभार्थी महिला ई-केवायसी पूर्ण करू शकत नव्हत्या. मात्र आता आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रती अंगणवाडी सेविकेकडे जमा कराव्या लागणार आहेत.

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत विधवा आणि घटस्फोटित महिलांना सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागत होता. कुटुंबातील पुरुष सदस्यांच्या आधार क्रमांकावर ओटीपी मिळत नसणे, राहत्या पत्त्यातील बदल, तसेच कागदपत्रांच्या पडताळणीतील विलंब यामुळे त्यांची प्रक्रिया प्रलंबित राहिली होती. आता त्यांना दिलासा मिळणार आहे.

Uddhav Balasaheb Thakaeray : शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यावर गुन्हा दाखल

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी सरकारने अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. ओटीपी न मिळणे, आधार पडताळणीतील तांत्रिक अडचणी यांसारख्या कारणांमुळे अनेक लाभार्थी महिलांची ई-केवायसी प्रलंबित होती.

लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. ओटीपी येत नसणे, आधार पडताळणीतील त्रुटी, तसेच कागदपत्रांची अपुरी पूर्तता ही प्रमुख कारणे असून त्यामुळे मोठ्या संख्येने प्रकरणे प्रलंबित आहेत.

मुदतवाढ मिळाल्यानंतर आता लाभार्थींना कागदपत्रांची सत्यप्रत अंगणवाडी सेविकेकडे जमा करून ई-केवायसी पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिलांना पूर्ववत लाभ मिळणार आहेत.

Shweta Mahale : चिखलीत ‘संवाद-सलोखा’ रेंगाळला!

लाडकी बहीण योजनेअंतर्गत गेल्या वर्षभरात तब्बल ४० हजार महिलांना विविध कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आले. कागदपत्रातील त्रुटी, चुकीची माहिती, एकाच कुटुंबातील अनेक लाभार्थी, तसेच नोकरदार महिला ही प्रमुख कारणे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.