Amol Mitkari : हक्कभंगाबरोबर मूकसमर्थन देणाऱ्यांवरही कारवाई व्हावी

action should also be taken against those who offer silent support : अमोल मिटकरी यांची फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

Akola विधान परिषदेतील हक्कभंग आणि अवमानाच्या सूचनेवर ९ डिसेंबर रोजी झालेल्या चर्चेदरम्यान आमदार अमोल मिटकरी यांनी हक्कभंग करणाऱ्यांवर तर कारवाई व्हावीच, परंतु त्यांना मूकसमर्थन देणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी केली. सभागृहात सदस्य प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या विशेषाधिकार भंगाच्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविताना ते बोलत होते.

मिटकरी म्हणाले की, “विधान परिषदेचा गौरवशाली इतिहास आहे. या सभागृहाचा अवमान करणारी कोणतीही भाषा किंवा भूमिका सहन केली जाणार नाही.” कर्जत-जामखेड मतदारसंघातील कार्यकर्ते सूर्यकांत मोरे यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, या भाषणामुळे वरिष्ठ सभागृहातील प्रत्येक सदस्याचा अवमान झाला आहे. तसेच, या अवमानजनक भाषणादरम्यान संबंधित मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हसत उभे असल्याची बाबही त्यांनी गंभीर असल्याचे नमूद केले.

Prevention of Fragmentation and Consolidation of Holdings Act : तुकडा बंदी कायदा, रवी राणांकडून जाहीर समर्थन

अवमानकारक वक्तव्ये जर विधिमंडळातील सदस्यांबाबत केली जात असतील, तर त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची गरज असल्याचेही मिटकरी यांनी सभागृहात स्पष्ट केले. हक्कभंग प्रस्तावावरून ९ डिसेंबर रोजी सभागृहात रंगलेल्या चर्चेनंतर आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या कडक भूमिकेमुळे पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.