Uddhav Balasaheb Thackeray : नव्या पदाधिकाऱ्यांच्या हाती निवडणुकीची दोरी!

Shiv Sena reshuffles, names new district office-bearers in Akola : अकोला जिल्ह्यात शिवसेनेची नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा

Akola शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यातील शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच पक्षसंघटन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर हे बदल करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील शहर, विधानसभा व विविध आघाड्यांतील जबाबदाऱ्या नव्या पदाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्या असून, त्यांच्याकडून पक्षवाढीबरोबरच संघटनात्मक कामकाजाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. अकोला पश्चिम शहरप्रमुख म्हणून आशीष गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्रासाठी उपजिल्हाप्रमुखपदी सुरेंद्र विसपुते यांची निवड करण्यात आली आहे.

Ravi Rana : मुख्यमंत्र्यांचे निर्देश अन् विकासाच्या १२ मुद्द्यांना गती!

शहर संघटक म्हणून राजू चव्हाण यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली असून, शहर युवा अधिकारीपदी प्रशांत मानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेतकरी प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी जिल्हा संघटक (शेतकरी सेना) म्हणून शिवा मोहोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते अकोला पूर्व व अकोट विधानसभा क्षेत्रात काम पाहणार आहेत.

याशिवाय जिल्हा संघटक म्हणून गंगाधर ढोरे यांच्याकडे बाळापूर, अकोट व मूर्तिजापूर विधानसभा क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली असून, भूषण भिरड यांच्याकडे अकोला पूर्व व अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्राचे काम सोपविण्यात आले आहे. जिल्हा समन्वयकपदी अश्विन पांडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते अकोला पूर्व व पश्चिम विधानसभा क्षेत्रातील समन्वयाचे काम पाहणार आहेत.

Vidarbha Farmers : शेतकऱ्यांच्या हिताचे तीन कृषी कायदे पुन्हा लागू करण्याची मागणी

नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे शिवसेना नेतृत्वाने अभिनंदन केले असून, पक्षवाढीसाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या नियुक्त्यांमुळे अकोला जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होईल, असा विश्वास पक्षाच्या वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.