MSRTC : जिल्हावासियांसाठी गुड न्यूज! एसटीच्या ताफ्यात १२ ईव्ही बसेस

12 EV buses added to the ST fleet : पर्यावरणपूरक व आरामदायी प्रवासाला मिळणार गती

Buldhana जिल्हावासीयांची ईव्ही बसची प्रतीक्षा अखेर संपली असून, राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात पहिल्या टप्प्यात १२ ईव्ही बसेस दाखल झाल्या आहेत. या आधुनिक बसेस लवकरच जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी मार्गांवर धावणार आहेत. त्यामुळे, जिल्ह्यातील प्रवाशांचा पर्यावरणपूरक व आरामदायी प्रवासाला गती मिळणार आहे.
जिल्ह्यात ईव्ही एसटी बस कधी येणार, याबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता होती. अखेर ही प्रतीक्षा संपली असून, जिल्ह्याला एकूण १५० ईव्ही बसेस मिळणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील १२ बसेस प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Water Crisis : पाणी असूनही पाण्यासाठी नागरिकांची वणवण

ईव्ही बस म्हणजे महाराष्ट्राच्या सार्वजनिक वाहतुकीत उचललेले एक आधुनिक व पर्यावरणपूरक पाऊल मानले जात आहे. या बसेस शून्य उत्सर्जन करतात, त्यामुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होण्यास मदत होणार आहे. तसेच या बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक असल्याने त्यांचा आवाज कमी असून प्रवास अधिक शांत, सुरक्षित व आरामदायी होणार आहे.
ईव्ही बसेस सुरू झाल्याने जिल्ह्यातील प्रवासी वाहतुकीला नवी दिशा मिळणार असून, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनेही ही बाब महत्त्वाची ठरणार आहे.