Madhuri Shipne elected as President of Deulgaon Raja Municipal Council : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक
Deulgao raja नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधुरी तुषार शिपणे यांची निवड झाली असून त्यांनी ९ हजार ९८८ मते मिळवत विजय संपादन केला आहे. या निकालामुळे नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगरपरिषदेत एकूण २१ सदस्य असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ९, भारतीय जनता पार्टीचे ३, शिवसेना (उबाठा) गटाचे २ तर आघाडीचे ७ सदस्य निवडून आले आहेत.
प्रभाग क्रमांक १ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिनाबाई सुभाष दराडे यांनी १ हजार ४६८ मते मिळवून विजय मिळवला असून प्रभाग क्रमांक १ ब मधून शिवसेना (उबाठा) गटाचे संदीप कोंडीराम शिंदे यांनी ८०८ मते घेत सदस्यपद पटकावले आहे. प्रभाग क्रमांक २ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली विकास कासारे यांनी १ हजार २०४ मते तर २ ब मधून शेख नमिराबी अतीक यांनी १ हजार २२२ मते मिळवत विजय संपादन केला आहे.
Local Body Elections : जळगाव जामोद नगराध्यक्षपदी भाजपची सरशी
प्रभाग क्रमांक ३ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदीप विठ्ठल वाघ यांनी १ हजार २८५ मते तर ३ ब मधून भाजपच्या वनिता राजेश भुतडा यांनी ९४९ मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे. प्रभाग क्रमांक ४ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खान रुख्साना नजीर यांनी ९०२ मते तर ४ ब मधून आकोट विकास आघाडीच्या शेख अनवर शेख अली यांनी १ हजार ३१ मते मिळवून विजय मिळवला आहे.
प्रभाग क्रमांक ५ अ मधून आकोट विकास आघाडीच्या विद्या अतिश कासारे यांनी ६८५ मते तर ५ ब मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विष्णू अर्जुन झोरे यांनी ७१९ मते मिळवून यश संपादन केले आहे. प्रभाग क्रमांक ६ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा दत्तात्रय गिते यांनी ८३४ मते तर ६ ब मधून भाजपच्या निशिकांत छबुराव भावसार यांनी ८७२ मते मिळवत विजय मिळवला आहे.
प्रभाग क्रमांक ७ अ मधून आकोट विकास आघाडीच्या शिवाजी हरिभाऊ मेहत्रे यांनी ६०३ मते तर ७ ब मधून शितल अतिश खरात यांनी ७४८ मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे. प्रभाग क्रमांक ८ अ मधून आकोट विकास आघाडीच्या काशिफखान आलमखान कोटकर यांनी ९०६ मते तर ८ ब मधून रंजना अनिल रामाणे यांनी १ हजार १९९ मते मिळवून विजय मिळवला आहे.
Local Body Elections : लोणारमध्ये काँग्रेस ठरला सर्वांत मोठा पक्ष
प्रभाग क्रमांक ९ अ मधून भाजपच्या अलका प्रविण धन्नावत यांनी ७७७ मते तर ९ ब मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नासेर अब्दुल रज्जाक बागवान यांनी ७९० मते मिळवत यश संपादन केले आहे. प्रभाग क्रमांक १० अ मधून आकोट विकास आघाडीच्या दिशा किशोर खांडेभराड यांनी १ हजार ५१५ मते तर १० ब मधून शिवसेना (उबाठा) गटाच्या रंजना गोविंदराव झोरे यांनी १ हजार २८९ मते मिळवून विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक १० क मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र तुकाराम खांडेभराड यांनी १ हजार ४४९ मते मिळवत सदस्यपद पटकावले आहे.








