Amravati Municipal Corporation Elections : काँग्रेस-शिवसेनेची संयुक्त बैठक, या मुद्यावर एकमत

Congress and Shiv Sena reach agreement on certain issues : महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा मार्ग सुकर

Amravati महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात आघाडी करून एकत्रितपणे निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने शनिवारी प्रमुख नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली. ज्या पक्षाचा ज्या प्रभागात प्रभाव आहे, त्या जागांवरच आघाडी करण्याचा आणि परस्पर समन्वयाने उमेदवार उभे करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

अमरावती महानगरपालिका निवडणुकीत आघाडी करण्यासंदर्भात झालेल्या या बैठकीला माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, तसेच शिवसेनेचे (उबाठा) माजी खासदार अनंत गुढे, सुधीर सूर्यवंशी, महानगराध्यक्ष पराग गुडधे यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.

Zilla Parishad Elections : आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक, अमरावती जिल्हा परिषदेचा मार्ग खडतर

बैठकीत संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात सरसकट आघाडी न करता, ज्या प्रभागांमध्ये संबंधित पक्षांचे प्रभावी उमेदवार आहेत, त्या ठरावीक प्रभागांमध्येच प्रभागनिहाय समन्वय साधून उमेदवार उभे करण्यावर एकमत झाले. चर्चा अत्यंत सकारात्मक झाल्याचे सांगण्यात आले असून, या चर्चेचा तपशील उभय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या स्तरावर अंतिम करून आघाडीवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

Akola Municipal Corporation : महाविकास आघाडीची चर्चा यशस्वी, जागावाटपावर पडदा कायम

महाविकास आघाडीच्या माध्यमातून अमरावती महानगरपालिका निवडणूक समन्वयाने आणि सक्षमपणे लढण्याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सहमती दर्शवल्याने आघाडीचा पुढील मार्ग आता अधिक सुकर झाल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीच्या चर्चेचा पहिला टप्पा पूर्ण होण्यापूर्वीच शिवसेनेने १५ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.