Former corporator joins BJP ahead of municipal elections : महापालिका निवडणुकीपूर्वी माजी नगरसेवकाचा भाजपमध्ये प्रवेश
Akola काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक हरीश आलीमचंदानी यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी पक्षात पुन्हा सक्रियपणे काम करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्या निलंबनाचा निर्णयही मागे घेण्यात आला आहे.
चंदानी यांच्या घरवापसीचे औपचारिक स्वागत कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, जयंत मसने, संतोष शिवरकर, वसंत बच्छुका, रंजीत खेडकर, बालटाले, रवींद्र भन्साली, गिरीश जोशी, अजय शर्मा, माधव मानकर, डॉ. अमित कावरे, संजय गोटफोडे, नितेश पाली आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Uddhav Balasaheb Thackeray : पहिले नाव नव्हते, नंतर थेट एबी फॉर्म, माजी महापौरांना दिलासा!
दरम्यान, विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारी, आघाडी व स्थानिक राजकारणातील समीकरणांमुळे अनेक ठिकाणी राजकीय ट्रेडिंग झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अकोल्यातही या घडामोडींचा परिणाम दिसून आला. मात्र, महापालिका निवडणूक ही स्थानिक विकासाशी निगडित असल्याने वैचारिक मतभेद बाजूला ठेवून संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येत असल्याचे भाजप नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
पक्षप्रवेशानंतर हरीश आलीमचंदानी यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “भारतीय जनता पक्षाने विकासाचे स्पष्ट व्हिजन दिले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे काम करू. पक्ष नेतृत्व जो आदेश देईल, त्याचे निष्ठेने पालन करू.”
यावेळी आलिमचंदानी यांनी भाजपच्या प्रदेश व स्थानिक नेतृत्वाचे आभार मानले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घरवापसीमुळे भाजपच्या स्थानिक राजकारणात नव्या हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे.








